Heat Wave : उष्णतेने गेल्या 146 वर्षांचा रेकॉर्ड मोडला
देशाच्या बहुतांश भागात पुढील तीन महिने वारंवार उष्णतेची लाट असणार आहे. उन्हाच्या झळांमुळे एसी, कुलर, पंखे वापर वाढल्याने वीजपुरवठ्यातही कमतरता जाणवेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
Heat Wave: उष्णतेने गेल्या 146 वर्षांचा रेकॉर्ड मोडलाय. फेब्रुवारीत संपूर्ण देशात तापमान प्रचंड वाढलंय. 1877 नंतर प्रथमच फेब्रुवारीत पारा एवढा वर गेलाय. देशात सरासरी तापमान 30 अंशांवर आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा हा प्रकार असल्याचं आयएमडीने म्हटल आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून उन्हाचा चटका आणखी वाढणार आहे (Extreme Heat In Maharashtra). अनेक भागात तापमानात वाढ होणार असल्याने नागरिकांनी दुपारी 11 ते 4 वाजेपर्यंत कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये अस आवाहन देखील हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे (Weather Update).