IPL ऑक्शनमुळे भारत सरकारची चांदीच चांदी, तिजोरीत जमा होणार तब्बल 900000000 रुपये, पण ते कसं?
IPL 2025 : आयपीएल 2025 साठी मेगा ऑक्शन 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी पार पडलं. यात एकूण 10 संघाचा सहभाग होता तर तब्बल 577 खेळाडू यंदाच्या ऑक्शनमध्ये सहभागी झाले होते. ऑक्शनमध्ये यंदा फ्रेंचायझींनी जवळपास 639.15 कोटी रुपये खर्च करून खेळाडूंना आपल्या संघांची जोडले. हे ऑक्शन विदेशात पार पडले असले तरी यामधून भारत सरकारची देखील बंपर कमाई झाली आहे.
1/7
सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात जगप्रसिद्ध टी 20 लीग असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनच मेगा ऑक्शन पार पडलं. यासाठी जवळपास 1500 हुन अधिक खेळाडूंनी नावं नोंदवली होती, मात्र यातून 182 खेळाडूंना संघांनी विकत घेतले. आयपीएल 2025 साठी खेळाडूंना रिटेन आणि ऑक्शनमधून विकत घेण्यासाठी आयपीएल फ्रेंचायझींच्या पर्समध्ये प्रत्येकी 120 कोटी रुपये होते.
2/7
3/7
4/7
5/7
आयपीएल 2025 मेगा ऑक्शनमध्ये भारताचा स्टार फलंदाज आणि विकेटकिपर ऋषभ पंतवर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली. 26.75 कोटींची बोली लागलेल्या श्रेयस अय्यरला मागे सोडून ऋषभ पंतवर लखनऊ सुपर जाएंट्सने तब्बल 27 कोटींची बोली लावली. तर त्याच्या खालोखाल केकेआरने व्यंकटेश अय्यरवर 23.75 कोटी खर्च करून आपल्या संघात घेतले.
6/7