ज्ञानेश्वर माऊलींचे 'हे' 10 विचार जगणं करतील सोपं; दृष्टीकोन 360 अंशांनी बदलेल

आळंदीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आज संजीवन समाधी सोहळा पार पडत आहे. माऊलींचा रथोत्सव बुधवारी पार पडला. या रथोत्सवासाठी दीडशे वर्ष जुन्या लाकडी रथाचा वापर करण्यात आला आहे. सोहळ्या निमित्तानं मंदिर आणि  परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यासोबतच आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांचे स्मरण करणे तितकेच महत्त्वाचे आहे. 

| Nov 28, 2024, 11:53 AM IST

आळंदीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आज संजीवन समाधी सोहळा पार पडत आहे. माऊलींचा रथोत्सव बुधवारी पार पडला. या रथोत्सवासाठी दीडशे वर्ष जुन्या लाकडी रथाचा वापर करण्यात आला आहे. सोहळ्या निमित्तानं मंदिर आणि  परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यासोबतच आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांचे स्मरण करणे तितकेच महत्त्वाचे आहे. 

1/11

माझा जन्म कोटे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई-वडील कसे असावेत, हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करुन माझे जीवन नक्कीच सुखी करु शकतो. 

2/11

ज्ञानी लोकांच्या सानिध्यात बसूनही मुर्ख लोकं त्यांच्या चुका शोधण्यात वेळ घालवतात. 

3/11

मी स्त्री असो वा पुरुष, रंग काळा असो वा पांढरा, माझ्या शरीराची ठेवण चांगली आहे. याची कृतज्ञता व्यक्त करुन जे आहे त्याची काळजी घेणे आणि त्याची देखभाल करणे आवश्यक आहे. 

4/11

आज जर यश, सुख, समृद्धी तुमच्या पायाखाली लोळण घेत असेल. तर भविष्यात हे कधीही नष्ट होऊ शकते. यामुळे कायम सावध राहून अहंकारापासून दूर राहा. 

5/11

आपल्या विचाराना भटक्या श्वानांप्रमाणे भटकू देऊ नका. कारण यामुळे तुमचे चिंतन बिघडते.

6/11

जर तुम्ही बाहेरुन संयमाने वागलात पण मनात क्लेष आणि द्वेष असेल. घाणेरडे विचार असतील तर तुम्ही योगी नाही तर रोगीच असाल. 

7/11

जगाला अधिक सुंदर बनवण्यासाठी तुम्हाला तुमचे योगदान देण्याची संधी मिळाली तर नक्कीच त्या संधीचं सोनं करा. 

8/11

जे आपल्याला मिळालं नाही त्याचा शोक करण्यापेक्षा, आपल्याला जे मिळालं आहे त्याबद्दल आभारी आणि कृतज्ञ राहणं अत्यंत गरजेचं आहे. 

9/11

अशी कोणतीच वस्तू नाही जी अभ्यासाने प्राप्त करता येत नाही. 

10/11

देह एक रथ आहे. इंद्रिय त्यामध्ये घोड्यासमान, बुद्धी सारथी आणि मन लगाम आहे. कारण फक्त देषाचे पोषण करणे म्हणजे आत्मघात. 

11/11

मुर्ख व्यक्तीसोबत वाद करुन कोणतीही व्यक्ती, बुद्धिमान होत नाही. मुर्ख व्यक्तीवर विजय मिळवायचा असेल तर एकमात्र उपाय म्हणजे त्या व्यक्तीकडे अजिबात लक्ष देऊ नका.