ज्या वयात PhD होत नाही, त्या वयात बनली पंतप्रधान! कोण आहे पैटोंगटार्न शिनावात्रा?

थायलंडच्या संसदेने तरुण नेतृत्व पंतप्रधानपदी आणलंय. 

| Aug 17, 2024, 10:57 AM IST

Thailand PM Paetongtarn Shinawatra: थायलंडच्या संसदेने तरुण नेतृत्व पंतप्रधानपदी आणलंय. 

1/7

ज्या वयात PhD होत नाही, त्या वयात बनली पंतप्रधान! कोण आहे पैटोंगटार्न शिनावात्रा?

Thailand Youngest Prime Minister Who is Paetongtarn Shinawatra World Marathi News

Thailand PM Paetongtarn Shinawatra:  थायलंडमध्ये वेळोवेळी राजकारणात मोठ्या हालचाल पाहायला मिळतात. थायलंडच्या सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांना पंतप्रधान पदावरुन हटवण्याचे आदेश दिले. यानंतर एक वेगळा राजकीय घटनाक्रम समोर आला. थायलंडच्या संसदेने तरुण नेतृत्व पंतप्रधानपदी आणलंय. 

2/7

सर्वात कमी वयाची पंतप्रधान

Thailand Youngest Prime Minister Who is Paetongtarn Shinawatra World Marathi News

भारतासारख्या देशात ज्या वयात मुलांची पीएचडीदेखील पूर्ण होत नाही, अशा वयात तरुणी थायलंडच्या पंतप्रधानपदी विराजमान झाली आहे. माजी पंतप्रधान आणि बिझनेस टायकून थाकसिन शिनावात्रा यांची मुलगी पैटोंगटार्न शिनावात्रा  थायलंडची सर्वात कमी वयाची पंतप्रधान बनली आहे. 

3/7

वय

Thailand Youngest Prime Minister Who is Paetongtarn Shinawatra World Marathi News

थायलंडच्या संसदेत पंतप्रधान निवडण्यासाठी मतदान झाले. यामध्ये पैटोंगटार्न शिवावात्रा यांना पंतप्रधान म्हणून निवडले आहे. पैटोंगटार्न शिनावात्राचे वय अवघे 37 वर्षे आहे. 

4/7

31 व्या पंतप्रधान

Thailand Youngest Prime Minister Who is Paetongtarn Shinawatra World Marathi News

शिनावात्रा या थायलंडच्या 31 व्या पंतप्रधान म्हणून कार्यभाग संभाळणार आहेत. त्या फू थाय पार्टीच्या नेता आहेत. आतापर्यंतच्या सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. 

5/7

दुसऱ्या महिला पंतप्रधान

Thailand Youngest Prime Minister Who is Paetongtarn Shinawatra World Marathi News

थायलंडच्या इतिहासातील त्या दुसऱ्या महिला पंतप्रधान म्हणून निवडल्या गेल्या. आपल्या परिवारातील तिसऱ्या पंतप्रधान म्हणून त्यांची निवड झाली. नवनिर्वाचित पंतप्रधानांचे वडील थाकसिन शिनावात्रा आणि त्यांची मावशी यिंगलक शिनावात्रादेखील महत्वपूर्ण पदावर राहिले आहेत.

6/7

319 खासदारांचे समर्थन

Thailand Youngest Prime Minister Who is Paetongtarn Shinawatra World Marathi News

पैटोंगटार्न फू थाई पार्टीच्या प्रभावशाली नेता आहेत. त्या 11 पक्षांचे आघाडीचे नेतृत्व करत आहेत. 319 खासदारांनी त्यांना समर्थन दिले आहे. पंतप्रधान पदी निवड झाल्यानंतर सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. 

7/7

अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचं आव्हान

Thailand Youngest Prime Minister Who is Paetongtarn Shinawatra World Marathi News

त्या देशातील लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. पैटोंगटार्न शिनावात्रा यांना पदाचा अनुभव नाही. थायलंडची अर्थव्यवस्था रुळावर आणणं हे त्यांच्यासमोर महत्वाचे आव्हान आहे.