मुंबईत अलिशान बंगला, महिन्याला लाखात कमाई! हा आहे जगातील सर्वात श्रीमंत भिकारी... एकूण संपत्ती कोट्यवधीत

Richest Begger in World : मुंबईतल्या रस्त्यांवरच्या सिग्नलवर, ट्रेनमध्ये हमखास भिकारी दिसतात. पण केवळ मुंबईतच नाही तर जगातल्या प्रत्येक देशात भिकारी आहेत. पण तुम्हाला माहित आहे का, जगातील सर्वात श्रीमंत भिकारी हा मुंबईतला आहे. आणि त्याची संपत्ती चक्क कोट्यवधीत आहे. 

| Aug 16, 2024, 20:45 PM IST
1/7

मुंबईत एक असा भिकारी आहे, जो केवळ देशातलाच नाही तर संपूर्ण जगातला सर्वात श्रीमंत भिकारी आहे. आणि या भिकाऱ्याची एकूण संपत्त कोट्यवधीत आहे. त्याच्याकडे अलिशान बंगला आणि प्रशस्त फ्लॅटही आहे. 

2/7

भिकारी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो ते मळलेले कपडे, विस्कटलेले केस, रडवेलेला चेहरा. दोन वेळच्या जेवणाचं सोडा तर पोटभर जेवणासाठीही त्यांना संघर्ष करावा लागतो. पण हा भिकारी इतर सर्व भिकाऱ्यांपेक्षा वेगळा आहे. त्याची महिन्याची कमाई  लाखात आहे. 

3/7

इकोनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार या भिकाऱ्याचं नाव आहे भरत जैन. जगात सर्वात श्रीमंत भिकारी म्हणून भरत जैनची ओळख आहे. मुंबईत राहाणारा भरत जैनकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. भरत जैन संपत्तीच्या बाबतीत उच्चशिक्षित कॉर्पोरेट नोकरी करणाऱ्यांना पण मागे टाकतो.

4/7

आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने भरत जैनने शिक्षण अर्धवट सोडलं. त्यानंतर तो मुंबईत आला. मुंबईत त्याने भीक मागायला सुरुवात केली. केवळ भिकेच्या जोरावर भरत जैनकडे आज 7.5 कोटी रुपयांची संपत्ती आहे. प्रत्येक महिन्याला तो 75 हजार ते 1 लाख रुपयांची कमाई करतोय

5/7

भरत जैनचं लग्न झालं असून तो मुंबईत पत्नी आणि दोन मुलांसह राहातो. त्याची दोन्ही मुलं कॉन्वेंट शाळेत शिक्षण घेतात. भीक मागून कमावलेल्या पैशातून त्याने वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक केली आहे.

6/7

मुंबईत भरत जैनचे दीड कोटी रुपयांचे दोन फ्लॅज आहे. ठाण्यात त्याची दोन दुकानं आहेत. दुकानाच्या भाड्यातून त्याला दरमहिना 30 हजार रुपये मिळतात. याशिवाय त्याचा एक अलिशान बंगला असल्याचाही रिपोर्ट आहे. 

7/7

इतकी संपत्ती असतानाही भरत जैन मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि आझाद मैदान या मोक्याचा जागेवर भीक मागतो. सध्या तो मुंबईतल्या परेल या भागात राहातो.