है तय्यार हम, श्रीलंका दौऱ्यासाठी भारताची यंग टीम सज्ज, BCCI ने फोटो केले शेअर

Jun 15, 2021, 22:30 PM IST
1/7

वेगवान गोलंदाज नवदीप सैनी (Navdeep Saini)आणि भारतीय संघाचा अनुभवी बॉलर युजवेंद्र चहल (Yujhwendra Chahal) यांचंही मुंबईत आगमन झालं आहे. भारतीय संघ 13 जुलैपासून सुरु होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यात श्रीलंका संघासोबत 6 सामने खेळणार आहे. ज्यामध्ये 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामन्यांचा समावेश असेल.

2/7

युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक इशान किशन (Ishan Kishan), पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि भारतीय संघात पहिल्यांदाच स्थान मिळालेला अर्शदीपही (Arshdeep Singh) फोटोमध्ये पाहिला मिळतायत.

3/7

बीसीसीआयने शेअर केलेल्या या फोटोमध्ये युवा क्रिकेटपटूंची फौज आहे. के. गौथम (K Gopwhtem), वरुण चक्रवर्ती (Varun Chakrawarthy), नितिश राणा (Nitish Rana), चेतन सकारिया (Chetan Sakariya), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि देवदत्त पड्डीकल (Devdatt Paddikal) यांचा समावेश आहे. भारतीय संघातील नवे आणि आनंदी चेहरे असं कॅप्शन या फोटोंना देण्यात आलं आहे.

4/7

भारताच्या एकदिवसीय संघाचा धडाकेबाज फलंदाज हार्दीक पांड्या (Hardik Pandya) आणि अष्टपैलू कुणाल पांड्याही (Kunal Pandya) या दौऱ्यासाठी सज्ज झाले आहेत. 

5/7

चायना मॅन बॉलर कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि मनिष पांडेलाही (Manish Pande) भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.

6/7

भारताच्या युवा संघाची जबाबदारी अनुभवी शिखर धवन यांच्या खांद्यावर असून भारताचा वेगवाग गोलंदाज भुवनेश्वर कुमार उपकर्णधार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा मुख्य संघ जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी सज्ज झालाय तर दुसरीकडे शिखर धवनच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंचा संघ श्रीलंका दौऱ्यासाठी तयार आहे.

7/7

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा मुख्य संघ जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी सज्ज झालाय तर दुसरीकडे शिखर धवनच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंचा संघ श्रीलंका दौऱ्यासाठी तयार आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या वन डे आणि टी-20 सामन्यांसाठी शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ तयारी करत असून संघातील सर्व खेळाडू मुंबईत दाखल झाले आहेत. बीसीसीआयने ट्विटरवर युवा खेळाडूंचे फोटो शेअर केले आहेत.