जगासमोर प्रेमाचा स्वीकार केल्यानंतर कसे वेगळे झाले अंकिता-सुशांत

Dec 19, 2020, 11:24 AM IST
1/8

आज अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) चा ३६ वा वाढदिवस. या निमित्ताने सुशांत आणि अंकिताच्या नात्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. या दोघांच्या फोटोची जोरदार चर्चा रंगली आहे. 

2/8

यावर्षी अंकिता लोखंडेला(Ankita Lokhande) जून महिन्यात एक्स बॉयफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा खूप मोठा धक्का बसला. 

3/8

अंकिता लोखंडे  (Ankita Lokhande) आणि सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)  यांचे रिलेशनशिप खूप काळ सुरू होतं. या दोघांची ओळख  एकता कपूरच्या टीवी शो `पवित्र रिश्ता` मध्ये झाली. दोघं को ऍक्टरनंतर एकमेकांचा चांगले मित्र झाले. या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्याचवेळी 'पवित्र रिश्ता' मालिका हिट झाली. 

4/8

दोघांनी डान्स रिऍलिटी शो 'झलक दिखला जा' मध्ये सोबत एन्ट्री घेतली. या रिऍलिटी शो दरम्यान व्हॅलेंटाइन डे चा स्पेशल एपिसोड होता. तेव्हा सुशांतने अंकिताला लाइव टीव्हीवर प्रपोझ करून सगळ्यांनाच सुखद धक्का दिला. 

5/8

सुशांतने अंकिताची सात जन्म साथ मागितली होती. त्यावेळी प्रियंका चोप्राने सुशांतला विचारलं की,'तू आता नॅशनल टीव्हीवर अंकिताला लग्नासाठी विचारलंस का?' त्यानंतर सुशांतने हो असं उत्तर दिलं. आणि साऱ्यांच्या नजरा अंकिताकडे वळल्या. अंकिताने देखील सुशांतसोबतच्या लग्नाला पसंती दिली होती. 

6/8

मात्र या दोघांच्या नशिबात काही वेगळंच लिहिलं होतं. यामुळे हे लोकप्रिय झालेलं नातं फार काळ टिकू शकलं नाही. सुशांत बॉलिवूडमध्ये नाव कमवू लागला आणि मालिकेतून सुरू झालेल्या या नात्यात दुरावा निर्माण होऊ लागला. यानंतर दोघांचं नातं संपुष्टात आलं. 

7/8

मीडिया रिपोर्ट आणि दोघांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट होतं की, सुशांत त्याचं यश खूप एन्जॉय करत होता. पण अंकिता मात्र इनसिक्युर होत असल्याचं दिसलं. 

8/8

सुशांतच्या आत्महत्येनंतर अंकिता आणि सुशांतचे फोटो पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेण्याकडे सगळ्यांचा रस होता. काही दिवसांपूर्वीच अंकिताने एका लाइव परफॉर्मन्समधून सुशांतला वाहिली श्रद्धांजली.