19th December Horoscope : राशीभविष्य | मनासारखी काम होणार

Dec 19, 2020, 07:58 AM IST
1/12

मेष राशीचं भविष्य

मेष राशीचं भविष्य

मेष: तुम्ही जर काही मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर आजचा दिवस तुमचा आहे. आज तुम्ही सहज काही गोष्टी मिळवू शकतो. पण याचा गैरफायदा घेऊ नका. स्वतःचा रस्ता स्वतः मिळवा. प्रत्येक गोष्ट योग्यपणे करा. 

2/12

वृषभ राशीचं भविष्य

वृषभ राशीचं भविष्य

वृषभ: स्वतःलाच आज तुम्हाला प्रेरित व्हायला हवं. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही स्वतःच्याच कोशात होतात. पण आता काही तरी मिळवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. तुम्हाला जे हवं त्याकरता मेहनत करावी लागणार आहे. ठरवलेल्या वेळेत काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. 

3/12

मिथुन राशीचं भविष्य

मिथुन राशीचं भविष्य

मिथुन: आज योग्य निर्णय घ्याल. आज कोणता मोठा निर्णय घ्यायचा असेल तर योग्य आहे. कुणा व्यक्तीवर विश्वास ठेवून काम करत असाल तर सावधान. 

4/12

कर्क राशीचं भविष्य

कर्क राशीचं भविष्य

कर्क: महत्वाचे निर्णय तुम्ही स्वतः घेण्याचा प्रयत्न करा. ती एक चांगली गोष्ट आहे. आपली सगळी ऊर्जा आज कामाला लावा. तुम्ही आज जे काही मिळवण्याचा प्रयत्न कराल ते मिळवू शकाल. स्वतःचं चिंतन करा आपण कुठे आहोत आणि काय करू शकतो. 

5/12

सिंह राशीचं भविष्य

सिंह राशीचं भविष्य

सिंह: आज तुमच्या डोक्यात अनेक गोष्टी असतील पण चिंता करू नका. सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडतील. तुम्हाला असं वाटत असेल की, तुमच्या आयुष्यात काहीच घडत नाही पण तसं नाही. चांगल्या वेळेची वाट पाहा. लवकरच चांगले दिवस येणार आहे. त्यामुळे ताण घेणं टाळा.

6/12

कन्या राशीचं भविष्य

कन्या राशीचं भविष्य

कन्या : कोणतीच माहिती आज तुमच्याजवळ ठेवू नका. आपल्या कडे असलेली माहिती इतरांसोबत शेअर करा. ज्यामुळे जवळच्या व्यक्तींना फायदा होईल. आज कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका. मोठ्या आणि जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्या. 

7/12

तूळ राशीचं भविष्य

तूळ राशीचं भविष्य

तूळ : आज तुम्हाला ताण-तणावापासून सुटका मिळेल. खूप दिवसांनी अगदी जवळच्या व्यक्तीसोबत चर्चा होईल. ही गोष्ट तुमच्यासाठी खास असेल कारण याने तुमचं मन प्रसन्न होईल. यामुळे तुम्ही थोडा वेगळा विचार करायला शिकाल.   

8/12

वृश्चिक राशि का राशिफल

वृश्चिक राशीचं भविष्य

वृश्चिक: आज आपल्यापेक्षा लहान असणाऱ्या व्यक्तीकडून सल्ला घ्याल. तुम्हाला अशा व्यक्तीची मदत घ्यावी लागेल जी व्यक्ती सगळ्याबाबतीत योग्य असेल. तुम्ही नवीन जगासोबत चालण्याचा प्रयत्न करा. पण असं असलं तरी तुम्ही जुन्या विचारांची कास धरणारी व्यक्ती आहात. 

9/12

धनु राशीचं भविष्य

धनु राशीचं भविष्य

धनु: आज आव्हान स्विकारू नका. अगदी संथपणे जसा दिवस सुरू आहे तसा जाऊ दे. आज नवीन गोष्ट करण्यासाठी अथवा जोखिम उचलण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही. आज तुम्ही आवडत्या व्यक्तीसोबत असाल त्यामुळे दिवस चांगला जाईल. आज अशा व्यक्तीकडून तुम्हाला मदत मिळेल जिथून तुम्ही कधी अपेक्षा केली नसेल. 

10/12

मकर राशीचं भविष्य

मकर राशीचं भविष्य

मकर: आजचा दिवस  तुमचा आहे. तुम्हाला समजून घेण्यात अनेकदा लोकं कमी पडतात पण आजचा दिवस वेगळा आहे. आज अशी कोणतीच समस्या येणार नाही. आज तुम्ही आनंदी असाल. कामात थोडी अडचण येऊ शकते. 

11/12

कुंभ राशीचं भविष्य

कुंभ राशीचं भविष्य

कुंभ: आज आपल्या शत्रूंपासून सावध राहा. तुमचा शत्रू समाजातील तुमची जागा घेण्याचा प्रयत्न करेल. पण तुम्ही चिंता करू नका. तुमचा खरा मित्र तुमच्यासोबत असं कोणतंच कारस्थान करणार नाही. तुम्ही इतरांसोबत जसे वागता तसेच तुमच्यासोबत वागत आहे. त्यामुळे जास्त ताण घेऊ नका कारण ही वेळ देखील जाणार आहे. 

12/12

मीन राशीचं भविष्य

मीन राशीचं भविष्य

मीन: तुम्हाला असं वाटत असेल की, तुम्ही तुमच्या वस्तूंपासून लपून आहात तर ते सत्य आहे. माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. स्वतःचं संरक्षण करण्यासाठी स्वतः प्रयत्नशील राहा. तसेच सत्य समोर ठेवून कोणताही निर्णय घ्या.