'साताऱ्याची माणसं थार वेडी' म्हणत हास्यजत्रेतील अभिनेत्याने घेतली महागडी कार

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याने आपल्या बायकोचा हात हातात घेत नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्वात महागडी कार खरेदी केली आहे. 

| Jan 12, 2025, 13:30 PM IST
1/7

रोहित माने

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम विनोदी अभिनेता रोहित मानेने त्याच्या चाहत्यांना इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत आनंदाची बातमी दिलीये.

2/7

महागडी कार

'साताऱ्याची माणसं थार वेडी' म्हणत अभिनेत्री नवीन वर्षाच्या सुरुवातीला महागडी कार खरेदी केली आहे. त्याचं थार घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. 

3/7

कारची पूजा

नुकताच त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो बायकोचा हात हातात घेत नवीन कारची पूजा करताना दिसत आहे. त्यासोबतच त्याचे कुटुंब देखील आहे. 

4/7

व्हिडीओ शेअर

अभिनेत्याने 'माने या ना माने' या इन्स्टाग्राम हँडलवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओवर चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनी देखील त्याचे अभिनंद केलं आहे. 

5/7

कॅप्शन

अभिनेत्याने शेअर केलेल्या या व्हिडीओला अंगावर शहारे येणारे म्युझिक लावले आहे. सध्या त्याच्या कॅप्शनची जोरदार चर्चा रंगली आहे.

6/7

कमेंट्सचा वर्षाव

काही चाहत्यांनी त्याच्या व्हिडीओवर 'भावा कडक' अशा कमेंट्स केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्याने मुंबईत स्वत:चं घर घेतलं आहे. 

7/7

आनंद

आपल्या नवीन कारची झलक दाखवत रोहित आणि त्याची बायको ड्राईव्हला जात असल्याच दिसत आहे. दोघेही आनंद साजरा करताना दिसत आहेत.