Paush Purnima 2025: पौष पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही या गोष्टी करू नका, अन्यथा...

पौष पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दानधर्म करणे उत्तम मानले जाते. पण पौष पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही या गोष्टी करू नका. 

| Jan 12, 2025, 15:37 PM IST
1/7

पौष पौर्णिमा

पौष पौर्णिमेला सोमवती पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते.   

2/7

महाकुंभमेळा

यावेळी 13 जानेवारीला पौष पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. त्यासोबतच पौष पौर्णिमेच्या दिवशी महाकुंभमेळाव्याला देखील सुरुवात होणार आहे.   

3/7

दानधर्म

या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दानधर्म केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की, या दिवशी कोणत्या गोष्टी करु नयेत. जाणून घेऊयात सविस्तर  

4/7

मासांहार आणि मद्य सेवन

पौष पौर्णिमेच्या दिवशी उशिरा झोपू नये. सकाळी लवकर उठून भगवान विष्णूची पूजा करावी. तसेच पौष पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही मासांहार आणि मद्य सेवन करू नये. 

5/7

सकारात्मक

पौष पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने स्वत: ला सकारात्मक ठेवावे. तसेच कोणत्याही व्यक्तीबद्दल चुकीचे शब्द वापरू नयेत.   

6/7

तुळशीची पाने

या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. कारण तुळशीला भगवान विष्णूला सर्वात प्रिय मानले जाते. या दिवशी काळे कपडे परिधान करू नयेत. 

7/7

केस आणि नखे

तसेच पौष पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीने केस आणि नखे कापणे टाळावे.  (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)