10 वर्षांनंतर सुरभी हांडेचं छोट्या पडद्यावर कमबॅक, 'या' मालिकेत होणार एन्ट्री

'जय मल्हार' फेम अभिनेत्री सुरभी हांडे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. ती 'या' मराठी मालिकेत दिसणार आहे. जाणून घ्या सविस्तर 

Soneshwar Patil | Dec 08, 2024, 18:39 PM IST

10 वर्षांनंतर सुरभी हांडेचं छोट्या पडद्यावर कमबॅक, 'या' मालिकेत होणार एन्ट्री | Surabhi Hande entry in Aai Tulja Bhawani serial of colors marathi 

1/7

जय मल्हार

'झी मराठी'वरील 'जय मल्हार' ही मालिका चांगलीच चर्चेत होती. ही मालिका खंडेरायाच्या जीवनावर आधारित होती. या मालिकेने तब्बल 3 वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. 

2/7

सुरभी हांडे

याच मालिकेतील म्हाळसा म्हणजेच अभिनेत्री सुरभी हांडे ही पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती कलर्स मराठीवरील 'आई तुळजाभवानी' मालिकेत झळकणार आहे. 

3/7

केदार शिंदे

सुरभी हांडे हिने चित्रपटात देखील काम केलं आहे. अभिनेत्रीने केदार शिंदे यांच्या 'अगं बाई अरेच्चा 2' चित्रपटात काम केलं आहे.   

4/7

आई तुळजाभवानी

लवकरच सुरभी हांडे ही 'आई तुळजाभवानी' या मालिकेत देवीच्या भूमिकेत दिसणार आहे. चाहत्यांनी तिच्या नवीन मालिकेसाठी तिला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. 

5/7

व्हिडीओ शेअर

या मालिकेचा व्हिडीओ कलर्स मराठीने त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा मालिका दररोज रात्री 9 वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे.   

6/7

म्हाळसा देवी

यामध्ये म्हाळसा देवी आई तुळजा भवानीचे नव्या प्रवासात अनोख्या पद्धतीने स्वागत करताना दिसणार आहे. सध्या चाहते या मालिकेची वाट पाहत आहेत. 

7/7

10 वर्षांनंतर कमबॅक

10 वर्षांनंतर परत सर्वांसमोर येत असल्याचा आनंद होत आहे. आता 'आई तुळजाभवानी' या पात्राच्या माध्यमातून मला म्हाळसाला न्याय देण्याची संधी मिळाली असल्याचं सुरभी हांडेने सांगितलं.