उन्हाळ्यात या '5' पदार्थांंपासून रहा दूर !

Apr 14, 2018, 08:43 AM IST
1/7

Summer Special Diet - Alcohol Drinks

Summer Special Diet - Alcohol Drinks

अल्कोहलचे सेवन हे शरीराला नुकसानकारच आहे. त्यामुळे यकृताचे नुकसान होते. उन्हाळ्याच्या दिवसात 'कूल' राहण्यासाठी जर तुम्ही मद्यसेवनाचा पर्याय निवडत असाल तर ते टाळा.  

2/7

Summer Special Diet - Tea, Coffee

Summer Special Diet - Tea, Coffee

उन्हाळ्याच्या दिवसात चहा, कॉफी शरीरात अधिक उष्णता वाढवू शकते. या पेयांंमुळे शरीरात  डीहायड्रेशनची समस्या अधिक वाढू शकते. यामुळे शरीरात पाणी कमी होते. सोबतच यामध्ये कॅलरीजचे प्रमाणही अधिक असते.

3/7

Summer Special Diet - Non veg food

Summer Special Diet - Non veg food

उन्हाळ्यात मांसाहारही बेतानेच करावा. तंदूरसारखे पचायला जड जाणारे पदार्थ आहारात टाळावेत.

4/7

Summer Special diet - spicy food

Summer Special diet - spicy food

उन्हाळ्यात आहारामध्ये मसालेदार पदार्थांंवर ताव मारणं टाळा. हलके फुलके आणि पाणीदार पदार्थांचा आहारात समावेश केल्याने पचन सुकर होते. 

5/7

Summer Special diet - Soft Drinks

Summer Special diet- Soft Drinks

उन्हाळ्यात गर्मीपासून रक्षण व्हावे म्हणून अनेकजण सॉफ्ट ड्रिंंक्सचा आहारात समावेश करतात. मात्र त्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक असल्याने मेटॅबॉलिजमच्या कार्यावर परिणाम होतो. परिणामी लठ्ठपणाची समस्या वाढते. म्हणूनच उन्हाळयात शहाळ्याचे पाणी, घरगुती लिंबू सरबत, कोकम सरबत यांंचा समावेश करावा.   

6/7

Summer special diet - Ice cream

Summer special diet - Ice cream

उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी थंडगार आईस्क्रिमचा आस्वाद घेण्याचा मोह होतो. त्यातही जर तुम्ही फीटनेस फ्रीक असाल तर शूगर फ्री आईस्क्रिमची तुम्ही निवड करता. मात्र शूगर फ्री आईस्क्रिम ही शरीरात उष्णता निर्माण करतात. पचनकार्यादरम्यान शरीरात उष्णता वाढते. 

7/7

Summer Special diet tips

Summer Special diet tips

उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणात उष्णता वाढलेली असते. त्यामुळे शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी आहारत योग्य अन्नपदार्थांंचा समावेश करणं गरजेचे आहे. आहारात ताक, दही, लस्सी अशा पदार्थांंचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.मात्र या सोबतीने कोणते पदार्थ टाळावेत हे जाणून घेण्यासाठी हा सल्ला नक्की जाणून घ्या.