PHOTO: 17 वर्षांचं करिअर, 450 सिनेमे; पडद्यावर सुपरहिट पण लोकांनी हिणवलं; 35 व्या वर्षी संपवलं आयुष्य; मृत्यू आजही रहस्य

Entertainment : ही अभिनेत्री आज आपल्यामध्ये नाही. तिने वयाच्या 35 व्या वर्षी आयुष्य संपवलेलं. तिचा मृत्यूचं रहस्य आजही गुलदस्त्यात आहे. पण 17 वर्षांच्या करियरमध्ये 450 सिनेमे केले. Rajinikanth सोबत तिचा रिलेशनशिपची जोरदार चर्चा झाली. या अभिनेत्रीच्या आयुष्यावर आणखी एक कोण बायोपिक बनतोय. कोण आहे ही अभिनेत्री पाहूयात. 

| Dec 03, 2024, 22:59 PM IST
1/10

फिल्मी दुनियेच्या ग्लॅमरमागे अनेक कथा दडलेल्या आहेत. इथे पडद्यावर दिसणाऱ्या हसऱ्या चेहऱ्यांमागे खूप दुःख लपलेलं असतं. अशाच एका अभिनेत्रीने साऊथ सिनेसृष्टीत खूप नाव कमावले होते पण तिच्या आयुष्याची कहाणी खूप वेदनादायी होती. 

2/10

सिल्क स्मिता हिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत खूप नाव कमावलं. ती ज्या चित्रपटात असायची तो चित्रपट हिट झालाच म्हणून समजा. स्लिकचा जन्म 2 डिसेंबर 1960 रोजी झाला आणि तिचं खरं नाव विजयालक्ष्मी होतं. सिल्क हे नाव तिला चित्रपटात आल्यावर मिळालं होतं.

3/10

सिल्क स्मिताच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. यामुळे तिला बालपणीच शिक्षण सोडावं लागलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, स्लिक स्मिताचं लग्न केवळ वयाच्या 14 व्या वर्षी झालं होतं. मात्र तिचे सासरे चांगले नव्हते आणि त्यांचे वागणे खूप वाईट होते. त्यामुळे सिल्क स्मिता एके दिवशी घर सोडून पळाली. 

4/10

त्यानंतर सिल्क स्मिताची आयुष्य जगण्यासाठी धडपड सुरू झाली. सिल्क मेकअप शिकली आणि तिने मेकअप आर्टिस्ट म्हणूनही काम करायला सुरुवात केली. चित्रपट दिग्दर्शक अँथनी ईस्टमन यांनी तिला त्यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली आणि हा तिच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला.

5/10

यानंतर तमिळ दिग्दर्शक विनू चक्रवर्ती यांनी तिला मोठा ब्रेक दिला. याशिवाय अभिनय, नृत्य आणि इंग्रजी शिकण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. सिल्क स्मिता त्यानंतर अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसू लागली. तिने तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी सर्व भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं.

6/10

एकीकडे स्मिताला खूप प्रसिद्धी मिळत होती, तर दुसरीकडे ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात इतकी आनंदी नव्हती. ती प्रेमात पडली पण तिला खरं प्रेम कधीच मिळालं नाही. असे म्हणतात की तिने एका डॉक्टरशी लग्न केलं होतं. त्यातच तिने आयुष्यभराची कमाई चित्रपट निर्मितीमध्ये गुंतवली होती मात्र त्यात सर्व पैसा गमावला.

7/10

सिल्कचे इतके चाहते होते की चित्रपटात दोन मिनिटांचा सीन असला तरी तिला पाहण्यासाठी लोक तिकिट खरेदी करायचे. सिल्क स्मिताने कमल हासन, रजनीकांत यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. रजनीकांतसोबत ती रिलेशनशिपमध्ये होती अशी चर्चा होती. एवढंच काय तर अशी देखील चर्चा होती की रजनीकांत हे सिगारेटने सिल्क स्मिताच्या शरीरावर खुणा करायचे. 

8/10

सिल्कने तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप त्रास सहन केला. याचमुळे एक दिवस तिने आत्महत्या करत जगाचा निरोप घेतला. मृत्यूच्या एक दिवस आधी तिच्या मैत्रिणीला भेटायला बोलावलं होतं पण ती पोहोचेपर्यंत सर्व काही संपले होतं. 23 सप्टेंबर 1996 रोजी सिल्कने आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली होती, ज्यामध्ये तिने, ती जीवनात खूश नाही आणि त्यामुळे जगाचा निरोप घेत आहे. असं लिहिलं होतं.

9/10

 'डर्टी पिक्चर' तुम्हाला आठवड असेल ज्यात विद्या बालनने सिल्कची भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आणि 18 कोटी रुपयांमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 115 कोटींहून अधिक कमाई केली होती. 

10/10

बोल्ड क्वीन अशी ओळख असलेल्या सिल्क स्मितावर अजून एक चित्रपट येणार असून तो तिचा बायोपिक असणार आहे. या चित्रपटाची घोषणा अभिनेत्री चंद्रिका रावने केली असून तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या बायोपिकचा टीझर शेअर केलाय.