Sooryavansham : 14 वर्षे बांधकाम, 35 खोल्या; ठाकूर भानुप्रताप सिंह यांची हवेली पाहिलीत का?
Jan 24, 2023, 19:31 PM IST
1/5
या चित्रपटातील कलाकारांसोबत त्यातील काही ठिकाणंही खूप प्रसिद्ध झाली आहेत. यामध्ये ठाकूर भानूप्रताप राहत असलेली हवेलीसुद्धा प्रसिद्ध झाली होती.
2/5
1999 मध्ये प्रदर्शित झालेला अमिताभ बच्चन यांचा दुहेरी भूमिका असलेला सूर्यवंशम चित्रपट गुजरातच्या बनारसकांठा येथे शूट करण्यात आला होता. यासाठी बलराम पॅलेसची निवड करण्यात आली होती आणि हा पॅलेस ठाकूर भानू प्रताप यांची हवेली बनली
TRENDING NOW
photos
3/5
चित्रपटाला 23 वर्षे झाली मात्र इतक्या वर्षांनंतरही हा पॅलेस जसाच्या तसा दिसतो. या हवेलीच्या बांधकामाला 100 वर्षे झाली आहेत. या हवेलीच्या ठिकाणी नवाब शिकारीसाठी येत असत. त्यानंतर तत्कालीन नवाब तल्ले मोहम्मद खान यांना ही जागा आवडल्याने येथे हवेली बांधली गेली.
4/5
हा महाल बांधण्यासाठी तब्बल 14 वर्षे लागली. याचे बांधकाम 1922 मध्ये सुरू आणि ते 1936 पर्यंत सुरु होते. या पॅलेसचे मालक हर्षदभाई मेहता आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी त्याचे नूतनीकरण केले होते. त्यानंतर त्यांनी याचा हॉटेल बनवण्याचा निर्णय घेतला.
5/5
आता हा पॅलेस शूटिंग आणि चित्रपटांसाठीही भाड्याने दिला जातो. या पॅलेसमध्ये एकूण 34 खोल्या असलेल्या या पॅलेसमध्ये सूर्यवंशमचे शूटिंग महिनाभर चालले होते.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.