Dal Tadka Benefits: केवळ चव नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतोय 'दाल तडका'

Dal Tadka Benefits: डाळीची चव वाढवण्यासाठी अनेकदा त्याला तडका लगावण्यात येतो. मात्र फार कमी लोकांना माहिती असेल की, डाळीला दिलेला तडका केवळ डाळीची चव वाढवत नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतो.

Jan 24, 2023, 19:22 PM IST
1/5

डाळीला तडका देताना जीरं, लसूण, मिर्ची, कांदा यांचा समावेश करावा. या सर्व गोष्टी आरोग्यासाठी गुणकारी असतात. जेव्हा तडक्यामध्ये या गोष्टींचा समावेश होतो, तेव्हा ते आरोग्यासाठी फार उपयुक्त ठरतं.

2/5

जेव्हा तुम्ही तडक्यामध्ये लसणीचा वापर करता, तेव्हा इम्युनिटी बूस्ट होते. लसणीत एंटीबॅक्टीरियल गुण असतात. ज्यामुळे इंफेक्शन, सर्दी, डोकेदुखी सारखे त्रास निघून जातात.

3/5

तुम्ही कोणत्याही पद्धतीचा तडका लावत असाल तर त्यामध्ये जीऱ्याचा वापर जरूर कराला. जीरं पचनासाठी चांगलं मानलं जातं.

4/5

तडक्यामध्ये सुक्या मिर्चीचा वापर केला जातो. यामध्ये अनेक व्हिटॅमीन असतात, ज्यामुळे दुखापतींपासून आराम मिळण्यास मदत होते. शिवाय लठ्ठपणा कंट्रोल होण्यासही फायदेशीर ठरतं.

5/5

यामध्ये वापरल्या जाणाऱ्या हिंगामुळे गॅसची समस्या दूर होते. शिवाय अपचन आणि एसिडीटीपासूनही आराम मिळतो.