बॉलीवूडच्या या अभिनेत्रीने 2 वर्षात दिले 21 हीट चित्रपट; अगदी कमी वयात गमावला जीव

90s Top Actress: बॉलिवूडमध्ये अशा फारच कमी अभिनेत्री आहेत ज्यांनी सिनेसृष्टीत अगदीच कमी कालावधीत स्वत:ची ओळख निर्माण केली. आपल्या उत्तम अभिनय कलेने सर्व चाहत्यांचे लक्ष वेधण्यासाठी कलाकारांना खूप मेहनत घ्यावी लागते. अशा अभिनेत्रींमध्ये आलिया भट्ट, कियारा अडवाणी, सारा अली खान, जान्हवी कपूर अशी अनेक नावे समोर येतात. परंतु, अशीच एक अभिनेत्री जिने बॉलिवूडमध्ये बरेच हीट चित्रपट देऊन सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवला. ही अभिनेत्री जरी आज आपल्यात नसली तरी तिने चित्रपटांनी आजही चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.

Jan 09, 2025, 17:26 PM IST

 

 

1/7

चाहत्यांच्या मनावर केले राज्य

आपल्या अभिनयाने सिनेसृष्टीत छाप सोडणाऱ्या आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अनेक अभिनेत्रींना आपण ओळखतो. आज आपण अशाच एका अभिनेत्रीविषयी जाणून घेणार आहोत जिने अगदी कमी कालावधीत स्वत:ची ओळख निर्माण केली. या अभिनेत्रीने आपल्या सुंदरतेने आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. ही अभिनेत्री आज आपल्यात नाहीये, तरीही तिचे चित्रपट आजही चाहते आवर्जुन आणि आवडीने पाहतात.   

2/7

खूपच कमी कालावधीत आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये आलिया भट्ट, कियारा अडवाणी, सारा अली खान, जान्हवी कपूर अशी अनेक नावे समोर येतात. परंतु, अशीच एक 90 च्या दशकातील अशाच एका अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये बरेच हीट चित्रपट देऊन सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवला. ही अभिनेत्री जरी आज आपल्यात नसली तरी तिने चित्रपटांनी आजही चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.   

3/7

90 च्या दशकातील नामांकित अभिनेत्री

ही अभिनेत्री आपल्या दमदार अभिनयासोबत सुंदरतेमुळे ओळखली गेली. चाहत्यांच्या मते, या अभिनेत्रीच्या जाण्यानंतर तिच्यासारखी दुसरी अभिनेत्री बॉलिवूड सिनेसृष्टीत झळकली नाही आणि दुसरी कोणतीच अभिनेत्री तिची जागा घेऊ शकली नाही. आज ती या जगात जरी नसली तरी तिचं नाव 90 च्या दशकातील नामांकित अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.   

4/7

कशी झाली करिअरची सुरुवात?

ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे दिव्या भारती. दिव्याचा जन्म 25 फेब्रुवारी 1974 ला मुंबई मध्ये झाला होता. त्यांनी 1990 मध्ये आपल्या अभिनयक्षेत्राची सुरुवात 'बोब्बिली राजा' या तेलगु चित्रपटापासून केली. ठीक दोन वर्षांनंतर 1992 मध्ये तिने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले.

5/7

दिव्या भारतीचा पहिला हिंदी चित्रपट 'विश्वात्मा' हा बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला. दिव्याला आपल्या पहिल्याच चित्रपटामुळे प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटानंतर निर्मात्यांची सुद्धा आवडती अभिनेत्री झाली. तिने एका वेळी अनेक प्रोजेक्ट्स साइन केल्याचे सांगितले जाते.   

6/7

2 वर्षातच दिले 21 हिट चित्रपट

'विश्वात्मा' या चित्रपटानंतर ती लोकप्रिय अभिनेता गोविंदासोबत 'शोला और शबनम' या चित्रपटात दिसली. तिच्या या चित्रपटाला सुद्धा बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळाले. त्यांनी फक्त दोन वर्ष सिनेजगतात काम केलं. मात्र या काळात दिव्याने 21 चित्रपटात काम केले. त्यापैकी 13 सुपरहिट आणि 8 हिट चित्रपट ठरले.   

7/7

दिव्या भारतीचे निधन

दिव्याने 'दिल का कसूर', 'दिल आशना', 'शतरंज' सारख्या चित्रपटात काम करुन आपले नाव कमावले. मात्र, वयाच्या अगदी 19 व्या वर्षी ती हे जग सोडून गेली. 1993 मध्ये दिव्याचे निधन झाले. मिडीया रिपोर्टनुसार, दिव्या व्यसनाधीन अवस्थेत ग्रील नसलेल्या खिडकीवर बसली होती. तिथून उठण्याचा प्रयत्न करत असताना तिचा पाय घसरला आणि पाचव्या मजल्यावरुन ती खाली पडली. त्यानंतर लगेच, रुग्णालयात नेले परंतु, डॉक्टर तिचा जीव वाचवण्यात अपयशी ठरले. दिव्याच्या मृत्युसंबंधित बरेच प्रश्न उभे राहिले मात्र आजही त्याचे उत्तर मिळू शकले नाही.