थेट आकाशातून पृथ्वीवर वीज पुरवठा; घराघरात कनेक्शन, आजपर्यंतचा सर्वात भन्नाट प्लान

नेमका काय आहे आकाशात वीज निर्मीती करण्याचा प्रयोग

वनिता कांबळे | Oct 25, 2024, 18:07 PM IST

Solar Power From Space To Earth: अणुऊर्जा, सौरऊर्जा आणि जल विद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून वीज निर्मीती केली जाते. आता लवकरच थेट आकाशातून पृथ्वीवर वीज पुरवठा होणार आहे. घराघरात  वीज कनेक्शन मिळणार आहे. एक ब्रिटीश स्टार्टअप कंपनी हा प्रयोग करणार आहे. जाणून घेऊया या प्रयोगाविषयी.

1/7

अंतराळात वीज निर्मीती करण्यासाठी अमेरिका, चीन, जापानसह अनेक देश प्रयत्न करत आहेत. मात्र, एका छोटाशा स्टार्ट कंपनीने बाजी मारली आहे. 

2/7

अंतराळात वीज निर्मीती हा उपग्रह सौर पॅनेलसह  सुमारे 400 मीटर रुंद असेल. या उपग्रहाचे वजन 70.5 टनापर्यंत असू शकते. पृथ्वीच्या मध्यम कक्षेतील ग्रहाभोवती हा उपग्रह फिरणार आहे. ही कक्षा 2,000 आणि 36,000 किलोमीटरच्या दरम्यानच्या उंचीवर अंतराळाच्या जवळ आहे.   

3/7

अवकाशातील उपग्रहातून उच्च-फ्रिक्वेंसी रेडिओ लहरींच्या स्वरूपात ऊर्जा पृथ्वीवर पाठवली जाणार आहे.  जमिनीवर असलेल्या अँटेनाच्या माध्यमातून ही ऊर्जा एकत्रित करुन तिचे विजेमध्ये रूपांतर केले आहे. यानंतर ते पॉवर ग्रीडला पाठवले जाणार आहे.

4/7

यूके स्पेस सोलर, रेकजाविक एनर्जी आणि आइसलँड यांच्या भागीदारीतून हा स्पेस सोलर पॉवर प्रोजेक्ट राबवला जाणार आहे. 

5/7

 2030 पर्यंत अंतराळात एक उपग्रह पाठवला जाणार आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून आइसलँड या देशात वीज पुरवठा केला जाणार आहे.   

6/7

एक ब्रिटीश स्टार्टअप कंपनी हा प्रयोग करणार आहे. अवकाशात वीज निर्मीती करण्याचा हा जगातील पहिलाच प्रयोग आहे.   

7/7

 2030 पर्यंत अंरळातील उपग्रहांद्वारे पृथ्वीला वीज पुरवठा केला जाणार आहे. 30 मेगावॅट ऊर्जा निर्माण केली जाणार आहे.