Sitaram Yechury : भाजपा-संघाचे कडवे टीकाकार काळाच्या पडद्याआड, असा होता सीताराम येचुरी यांचा राजकीय प्रवास

Sitaram Yechury Passes Away : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचं दीर्घ आजाराने गुरुवारी (12 सप्टेंबर 2024) ला निधन झालं. दिल्ली एम्स रुग्णालयात त्यांना प्रकृती खालावल्यामुळे मंगळवारी (10 सप्टेंबर 2024) ला दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 

Sep 12, 2024, 17:11 PM IST
1/7

डाव्या विचारांच्या चळवळीचे नेते आणि मार्क्सवादी नेते सीताराम येचुरी हे एक सामान्य कार्यकर्ता ते सरचिटणीस असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. भारतीय डाव्या राजकारणातील ते सामान्य कार्यकर्ता ते सरचिटणीस असा त्यांचा प्रवास होतो. 

2/7

सीताराम येचुरी यांचा जन्म 12 ऑगस्ट 1952 रोजी चेन्नईमध्ये झाला. तर त्यांचं शालेय शिक्षण हैदरबादमधून तर दिल्ली विद्यापीठातील सेंट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी घेतली. त्यानंतरजवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (JNU) मधून अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलंय.  

3/7

1970 मध्ये विद्यार्थीदशेतच त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्टूडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया संघठनेत ते सहभागी झाले. त्यानंतर 1984 साली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे ते सदस्य बनले. पुढे 1992 मध्ये त्यांची पॉलिटब्युरोमध्ये नियुक्ती करण्यात आली. एक एक राजकीय प्रवास पुढे सुरु होता. त्यांनी बरेच वर्ष पक्षाचे मुखपत्र पीपल्स डेमोक्रसीचे संपादकपद भूषवलं. 

4/7

1975 च्या आणीबाणीच्या काळात त्यांनी सरकारविरोधी आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे त्यांना जेलमध्येही जावं लागलं होतं. CPI(M) चे महत्त्वाचे नेते म्हणून 2005 मध्ये त्यांची राजकीय कार्यकारिणी समितीमध्ये निवड झाली. त्यानंतर 2015 मध्ये ते पहिल्यांदा पक्षाचे सरचिटणीस झाले. 

5/7

विविध आंदोलनं, कामगारांच्या हक्कांसाठी संघर्ष करणारा हा नेता 2018 आणि 2022 मध्ये पुन्हा एकदा सरचिटणीस म्हणून कार्यभार सांभाळायला लागला. 

6/7

गेली 50 वर्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट विचारसरणीसाठी आयुष्य झोकून देणारे येचुरी राज्यसभा खासदारही होते. त्यांनी कामगार, गरीब आणि मध्यमवर्गीयांचे अधिकार आणि समस्यांवर आवाज उठवला. त्यांची संसदेतील अनेक भाषणे गाजली आहेत. 

7/7

धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर कायम भूमिका घेणारे आणि संघ परिवाराच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला नेहमी विरोध करणारे येचुरी यांनी कायम रस्त्यावर उतरून लढाई केली आहे.