'पत्नीला लैंगिक सुख देण्यास असमर्थ असलेल्या...'; बादशाहने सांगितला करण जोहरचा 'तो' किस्सा
Badshah's Shocking Revelation: आपल्या गाण्यांसाठी आणि संगीतासाठी प्रसिद्ध असलेल्या बादशाहने एका मुलाखतीमध्ये त्याला मिळालेल्या एका फारच वेगळ्या ऑफरबद्दल नुकताच धक्कादायक खुलासा केला. तो नेमकं काय म्हणालाय पाहूयात...
Swapnil Ghangale
| Sep 12, 2024, 16:20 PM IST
1/11
2/11
3/11
4/11
5/11
6/11
7/11
खरंच तू करणला असं म्हणाला का? असा प्रश्न बादशाहला पुन्हा विचारण्यात आला. त्यावर त्याने, "हो खरंच, आम्ही 'दिल है हिंदुस्तानी' नावाच्या कार्यक्रमाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहत होतो. ते अगदी माझ्या बाजूलाच बसले होते. तेव्हा ते म्हणाले, एक भूमिका आहे. मला वाटतं तो तुला योग्य ठरेल. मला आधी वाटलं ते मस्करी करत आहेत," असं सांगितलं.
8/11
बादशाहच्या डोक्यातून हा विषय निघून सुद्धा गेला. मात्र दुसऱ्या दिवशी परत करण जोहर आला आणि त्याने बादशाहला भूमिकेसंदर्भात सांगितलं. "त्यानंतर सेटवर आलेल्या वरुण धवनने मला धर्मा प्रोडक्शन लॉन्च करत असल्याबद्दल माझं अभिनंदन केलं. मात्र मी ती भूमिका नाकारली कारण मी ती साकारु शकेल की नाही मला ठाऊक नव्हतं. मी त्यावेळेस स्वत:च्या प्रतिमेबद्दल फारच विचार करत होतो," असं बादशाह म्हणाला.
9/11
"त्यानंतरही मला दिलजीत दोसांजबरोबर 'गुड न्यूज'मधील भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. "मी मनालीमध्ये ट्रेक करत असताना मला करण सरांचा मिस कॉल दिसला. त्यांनी मला मुंबईला यायला सांगितलं. तिथे शंकर खतना सुद्धा होता. त्या दोघांनी मला राजकडे ऑडिशन देण्यास सांगितलं. त्यांनी मला मुलं होत नसलेल्या पात्रासाठी ऑडिशन द्यायला सांगितलं होतं," असं बादशाह म्हणाला.
10/11