PHOTO : लव्ह मॅरेज 4 वर्षात मोडलं, समंथासोबतही अफेअरची चर्चा, 3 हिरोईननंतर आता 'हीरामंडी' अभिनेत्रीच्या प्रेमात

Entertainment : लव्ह मॅरेज 4 वर्षात मोडलं, या अभिनेत्याच्या रोमँटिक मूडमुळे समंथासोबत ब्रेक झाल्याचा चर्चा असताना आता हीरामंडी' मधील अभिनेत्रीच्या प्रेमात आहे.

Apr 17, 2024, 12:24 PM IST
1/8

फोटोमधील गोड चिमुकल्या आज सिनेसृष्टीतील नावाजलेला अभिनेता आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की, नुसतं अभिनय नाही तर त्याच्या आवाजाच्या जादूने चाहते मंत्रमुग्ध होतात. एवढंच नाही तर निर्मिती आणि लेखनातही तो तरबेज आहे. 

2/8

ओळखलं का आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत? आज या अभिनेत्याचा 45 वा वाढदिवस आहे. अमिर खानसोबत या अभिनेत्याने लीड रोल केला होता. आम्ही बोलत आहोत रंग दे बसंतीचा अभिनेता सिद्धार्थ नारायण याच्याबद्दल

3/8

सिद्धार्थने 40 हून अधिक बॉलिवूडमध्ये चित्रपटात कामं केलंय तर 12 हून अधिक चित्रपटांच्या गाण्यांनाही आवाज दिला आहे. 

4/8

1979 मध्ये चेन्नईमध्ये जन्म झालेल्या सिद्धार्थचं शिक्षण दिल्लीत झालं. मणिरत्नम यांच्या 'कन्नथिल मुथामित्तल' या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर 2003 मध्ये तेलुगू चित्रपट 'बॉईज'मधून अभिनयाचा क्षेत्रात त्यांनी उडी मारली. 

5/8

2003 मध्ये मेघना नारायणसोबत केलेल प्रेम विवाह 4 वर्षांनी मोडलं. मेघना ही दिल्लीत त्यांच्या घराच्या शेजारी राहायची. त्यावेळी सैफ अली खानची बहिण सोहा अली खानसोबतची जवळीक त्यांच्या घटस्फोटाचा कारण ठरलं होतं असं मीडिया रिपोर्टमध्ये बोलं जातं. 

6/8

त्यानंतर सिद्धार्थचं नाव अभिनेत्री श्रुती हसनसोबत जोडलं गेलं. 'ओह माय फ्रेंड' मध्ये त्या दोघांमध्ये प्रेम बहरलं होतं असं म्हणतात. 2011 मध्ये हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. घरच्यांचा त्यांच्या नात्याला पाठिंबा होता. पण कालांतराने या नात्यालाही ब्रेक लागला. 

7/8

त्यानंतर सामंथासोबत त्याचं नाव जोडल्या गेलं. एवढंच नाही तर त्यांच्या लग्नाची चर्चाही रंगली होती. हे नातं फार काळ टिकलं नाही. त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला आणि ते नातंही संपुष्टात आलं. कन्नड अभिनेत्री दीपा सानिधीमुळे ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. 

8/8

हिरामंडीमधील अभिनेत्री अदिती राव हैदरीसोबत त्याने साखरपुडा केला आहे अशी पोस्ट त्यांनी इन्स्टाग्रामवर टाकली होती.