Shukra Gochar 2023: निर्जला एकादशीपासून 'या' राशींचे भाग्य चमकणार; 6 जुलैपर्यंत जगणार राजासारख जीवन

Shukra Gochar 2023 : प्रेम आणि वैभवदाता शुक्र ग्रह 30 मे 2023 मंगळवारी कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. शुक्र गोचरमुळे काही राशींवर सकारात्मक तर काहींवर नकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. जाणून घ्या तुमच्या राशीवर काय परिणाम होणार ते.

May 29, 2023, 08:54 AM IST

Shukra Gochar 2023 Effects : प्रणय, वैवाहिक सुख, विलास आणि प्रसिद्धीची अधिपती शुक्र ग्रहण काही तासांमध्ये आपलं घर बदलणार आहे. शुक्र ग्रहण चंद्र राशीत म्हणजे कर्क राशीत गोचर करणार आहे. (Shukra Gochar Made Lakshmi Rajyog venus transit in cancer know the effect on your zodiac signs Horoscope 30 May 2023)

 

1/14

लक्ष्मी राजयोग

शुक्र गोचरमुळे काही राशींना 6 जुलैपर्यंत राजासारख जीवन जगता येणार आहे. विशेष म्हणजे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र देवाच्या गोचरमुळे मकर राशीत लक्ष्मी राजयोग तयार होत आहे. 

2/14

शुक्र गोचर

शुक्र देव 30 मेला संध्याकाळी 7 वाजून 29 मिनिटांनाही कर्क राशीमध्ये गोचर करणार आहे. 6 जुलैपर्यंत शुक्र ग्रहण कर्क राशीत असणार आहे. 

3/14

मेष (Aries)

शुक्र तुमच्या चौथ्या घरात असणार आहे. कुंडलीती चौथ घर हे जमीन, इमारत आणि वाहन यांचं आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना या महिन्याभरात मालमत्ता, वाहन खरेदीचे योग आहेत. मात्र विवाहबादह्य संबंधांमध्ये काळजी घ्या. शुक्र गोचर काळात महिनाभर घरात कापूरचा दिवा लावा. 

4/14

वृषभ (Taurus)

शुक्र तुमच्या तिसऱ्या घरात असणार आहे. कुंडलीतील हे घर शौर्य, भावंड आणि कीर्तीशी जोडलेल आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना भावंडांची उत्तम साथ मिळणार आहे. धार्मिक स्थळी फिरायला जाणार आहात. घरात आनंदाचं वातावरण असणार आहे. 

5/14

मिथुन (Gemini)

शुक्र तुमच्या दुसऱ्या घरात असणार आहे. कुंडलीतील दुसरं स्थान हे संपत्ती आणि प्रकृतीशी निगडित आहे. त्यामुळे पुढील महिनाभर तुम्हाला शुक्र गोचर भाग्यशाली ठरणार आहे. तुम्हाला धनलाभाचे योग आहेत.   

6/14

कर्क (Cancer)

शुक्र तुमच्या पहिल्या घरात म्हणजेच चढत्या घरात असणार आहे. कुंडलीतील पहिलं स्थान हे शरीर आणि चेहऱ्याशी निगडित आहे. याचा अर्थ शुक्र गोचरमुळे कामाच्या ठिकाणी तुम्हाला योग स्थान मिळेल. वाहन खरेदीचे योग आहेत. मात्र जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. 

7/14

सिंह (Leo)

शुक्र तुमच्या बाराव्या घरात असणार आहे. कुंडलीतील बारावं घर आर्थिक आणि आरोग्याशी जोडलेल आहे. त्यामुळे तुम्हाला आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागणार आहे. सुखासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावा लागणार आहे. तुम्हाला आर्थिक फायदादेखील होणार आहे. पण तो पैसा दुसऱ्या मार्गाने खर्च होणार आहे. 

8/14

कन्या (Virgo)

तुमच्या अकराव्या घरात शुक्रदेव प्रवेश करणार आहे. या घराचे संबंध उत्पन्नाशी आणि इच्छापूर्तीशी आहे. त्यामुळे शुक्र गोचरमुळे तुम्हाला उत्पन्न वाढवण्यासाठी कठोर मेहनत करावी लागणार आहे. तुमच्या विचारावर नियंत्रण राहणार नाही. 

9/14

तूळ (Libra)

तुमच्या दहाव्या घरात शुक्रदेव संक्रमण करणार आहे. हे घर करिअर, राज्य आणि पित्याशी जोडल गेलं आहे. त्यामुळे तुम्हाला करिअरमध्ये यश गाठता येणार आहे. तुमच्या सर्व इच्छा या दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे. तुमच्यासोबतच वडिलांचीही प्रगती होण्याचे संकेत आहे.  

10/14

वृश्चिक (Scorpio)

तुमच्या नवव्या घरात शुक्रदेव असणार आहे. हे स्थान आपल्या भाग्याशी जोडलं गेलं आहे. शुक्र गोचरमुळे या दिवसात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. घरातील वडीलधाऱ्यांकडून धनलाभाचे योग आहेत. मुलांकडून आनंदाची वार्ता मिळेल. 

11/14

धनु (Sagittarius)

तुमच्या आठव्या भावात शुक्र प्रवेश करणार आहे. अष्टम स्थान हे आपल्या वयाशी जोडल गेलं आहे. शुक्र गोचरमुळे महिन्याभर तुम्ही निरोगी राहणार आहात. या काळात तुम्ही कोणाला वचन दिलं असेल तर ते तुम्ही पूर्ण कराल. मात्र कोणाशीही वाद टाळा.  

12/14

मकर (Capricorn)

शुक्र तुमच्या सातव्या घरात संक्रमण करणार आहे. हे स्थान आपल्या जीवनसाथीशी जोडलेल आहे. शुक्र गोचरमुळे जोडीदाराशी तुमचं नात मजबूत होणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. कामासंबंधी प्रवासाचे योग आहेत. 

13/14

कुंभ (Aquarius)

शुक्र तुमच्या सहाव्या घरात असणार आहे. हे स्थान मित्र, शत्रू आणि आरोग्याशी जोडलेल आहे. त्यामुळे या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. मित्रमैत्रिणींकडून मदत मिळणार आहे. मात्र शत्रूपासून सावध राहण्याची गरज आहे.

14/14

मीन (Pisces)

शुक्र तुमच्या पाचव्या घरात असणार आहे. कुंडलीतील हे घर तुमच्या मुलांशी संबंधित आहे. त्याशिवाय बुद्धिमत्ता, विवेक आणि प्रणय यांच्याशी जोडलं गेलं आहे. त्यामुळे शुक्र गोचर या राशीसाठी भाग्यशाली ठरणार आहे. प्रेम जीवनात सुख आणि कुटुंबात आनंद असणार आहे. या दिवसात तुमची प्रगती होणार आहे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)