Shiv Jayanti 2024 : रयतेचा राजा... छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, शेअर करा WhatsApp, HD Image, Status फोटो

Shiv Jayanti Quotes in Marathi : छत्रपती शिवाजी महाराजांची 19 फेब्रुवारी 2024 रोजी 394 वी जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपसुपकच 'जय' असा जयघोष होतो. अशा शिवरायांना मानाचा मुजरा. 

| Feb 19, 2024, 12:48 PM IST

Shivaji Maharaj Jayanti Quotes in Marathi : छत्रपती शिवाजी महाराजांनी मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. जुलमी राज्यकर्त्यांविरुद्ध लढून रयतेचे राज्य निर्माण केले. त्यामुळे त्यांना 'रयतेचा राजा' म्हणून संबोधलं गेलं.  तुम्ही तुमचे whatsapp स्टेटस छत्रपती शिवाजी महाराजांचे सुंदर स्टेटस म्हणून सेट करू शकता. तुमची छाती अभिमानाने भरून येईल. आणि शिवरायांना मानाचा मुजरा करू शकता. 

1/8

महाराजांना मानाचा मुजरा

Shiv Jayanti Wishes in Marathi

गर्व आहे शेंदूर गुलालाचा, गर्व आहे त्या बेधुंद तुतारीचा, गर्व आहे विठोबा-माऊलीचा, अन गर्व आहे महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराजाच्या.

2/8

महाराजांना मानाचा मुजरा

Shiv Jayanti Wishes in Marathi

वाघाची जात कधी थकणार नाही, शत्रूंच्या समोर कधी झुकणार नाही, शपथ आहे आम्हाला या मातीची मरे पर्यंत जय शिवराय म्हणायला कधी विसरणार नाही.

3/8

महाराजांना मानाचा मुजरा

Shiv Jayanti Wishes in Marathi

आयुष्य छान आहे, थोड लहान आहे परंतु, छत्रपती शिवरायांच्या मातृभुमी वर जन्माला आलो याचाच मला अभिमान आहे.

4/8

महाराजांना मानाचा मुजरा

Shiv Jayanti Wishes in Marathi

माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय धन्य धन्य माझे शिवराय !! जय जिजाऊ जय शिवराय !! !! जय शंभूराय !!

5/8

महाराजांना मानाचा मुजरा

Shiv Jayanti Wishes in Marathi

नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी। नमो धर्मभूमी जिच्या कामी, पडो देह माझा सदा ती नमामी ।।

6/8

महाराजांना मानाचा मुजरा

Shiv Jayanti Wishes in Marathi

सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला.

7/8

महाराजांना मानाचा मुजरा

Shiv Jayanti Wishes in Marathi

इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे, राजा शिवछत्रपती.

8/8

महाराजांना मानाचा मुजरा

Shiv Jayanti Wishes in Marathi

जगणारे ते मावळे होते, जागवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायेनं काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता फक्त माझा शिवबा होता!!