'तुमच्या वडिलांनी घर घेतलं...'; भावाच्या पोटी जन्माला आलोय म्हणणाऱ्या अजित पवारांना सुप्रिया सुळेंचे उत्तर

Maharashtra Politics : आमची बदनामी का केली जात आहे? तुमच्या सख्ख्या भावाच्या पोटीच मी जन्माला आलो ना असं सांगत अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधला होता. त्याला आता सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Feb 18, 2024, 14:36 PM IST
1/7

ajit pawar NCP

वरिष्ठांनी सांगितलेल्या व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष केलं असतं तर ते चांगलं. आम्ही झालो तर निव्वळ बेक्कार. पक्ष चोरला असं म्हणतात. निवडणूक आयोगाने, विधानसभा अध्यक्षांनी आम्हाला मान्यता दिली आहे. आम्ही आमची बाजू मांडली होती. प्रतोदच आमच्या बाजूने आहे, असे अजित पवारांनी म्हटलं होतं.

2/7

ajit pawar on sharad pawar

मग अशी बदनामी का केली जात आहे. म्हणजे वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर आम्हाला अध्यक्षपद मिळालं असतं. पक्ष माझ्या ताब्यातच आला असता. तुमच्या सख्ख्या भावाच्या पोटीच मी जन्माला आलो ना,  असे अजित पवार म्हणाले होते.

3/7

ajit pawar on baramati

म्हणून मी सांगत आहे की कोणीही फोन केला तर तुम्ही भावूक होऊ नका. आम्हाला 15 वर्षात फोन नाही आला तो आता येत असल्याचं सांगत आहेत. तुमच्यासाठी केलेलं सगळं विसरुन जात असाल तर ते बरोबर नाही, असेही अजित पवार म्हणाले.

4/7

sharad pawar on ajit pawar

अजित पवारांनी आपल्याला एकटं पाडलं जात असल्याचा आरोप केला आहे. त्यावर शरद पवार म्हणाले की, 'निवडणुकीत मतदारांशी साथ जोडण्यासाठी त्यांनी हे केलं असावं. पण कुटुंबातील सर्व लोक एका बाजूला आणि मीच एकटा सांगणं आहे सांगणं म्हणजे सतत भावनात्मक भूमिका मांडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न दिसत आहे.'

5/7

sharad pawar phone call

मला अनेक कार्यकर्त्यांनी फोन येतात, दमदाटी केली जात आहे असं सांगितलं जात आहे. बारामती मतदारसंघात पहिल्यांदाच अशा गोष्टी होत आहेत अशी खंत शरद पवारांनी व्यक्त केली. 

6/7

supriya sule on ajit pawar

राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवार यांनी स्थापन केला. शरद पवार हे संस्थापक सदस्य आणि अध्यक्ष आहे. तार्किकदृष्ट्या बोलायचं तर हा पक्ष त्यांनाच मिळाला असता, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

7/7

ajit pawar vs supriya sule

"तुमच्या वडिलांनी घर घेतलं असेल तर ते वडिलांच्या नावावरच असणार ना. तु्म्ही वडिलांना बाहेर काढू शकत नाही. कारण त्यांचे त्यावर नाव आहे. पण आता नवीन राज्य सुरु झालं आहे. देशात अदृश्य शक्ती जे करतेय हे अतिशय दुर्दैवी आहे," असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.