शंभर कोटी जप्त झाल्यानंतर धक्काही लागला नाही, अशी किती श्रीमंत आहे शिल्पा शेट्टी?

90च्या दशकातील अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा अजूनही चाहता वर्ग आहे. शिल्पाने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मात्र, तिच्यासाठी हे यश मिळवणे खूप कठिण होते. 

| Apr 18, 2024, 17:01 PM IST

90च्या दशकातील अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा अजूनही चाहता वर्ग आहे. शिल्पाने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मात्र, तिच्यासाठी हे यश मिळवणे खूप कठिण होते. 

1/9

शंभर कोटी जप्त झाल्यानंतर धक्काही लागला नाही, अशी किती श्रीमंत आहे शिल्पा शेट्टी?

 Shilpa Shetty thrown out from movies now owns private jet

शिल्पा शेट्टी हिचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ईडीने शिल्पा आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यावर मनी लाँड्रिंगप्रकरणी कारवाई केली आहे. 18 एप्रिल रोजी राज कुंद्राची 97 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. 

2/9

 Shilpa Shetty thrown out from movies now owns private jet

शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. शिल्पाने 1993मध्ये आलेल्या बाजीगर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. मात्र, तुम्हाला माहितीये का एकदा शिल्पाला कोणत्याही कारणाशिवाय चित्रपटातून काढले होते. खुद्द अभिनेत्रीनेच हा खुलासा केला आहे. 

3/9

स्ट्रगल

 Shilpa Shetty thrown out from movies now owns private jet

शिल्पा शेट्टीने एका मुलाखतीत तिच्या सुरुवातीच्या स्ट्रगलबद्दल सांगितले होते. शिल्पा शेट्टी म्हणते की, मी सावळी, उंच आणि सडपातळ अशी मुलगी होते. सुरुवातीला पदवीचे शिक्षण झाल्यानंतर वडिलांना व्यवसायात मदत करायची असे ठरवले होते. मात्र एकदिवस सहजच एका फॅशन शोमध्ये हिस्सा घेतला. जिथे एका फोटोग्राफरसोबत माझी ओळख झाली. ज्याला माझे फोटो काढायचे होते.   

4/9

पहिला चित्रपट

 Shilpa Shetty thrown out from movies now owns private jet

त्यानंतर लगेचच मला माझा पहिला चित्रपट मिळाला. त्यानंतर मी कधीच मागे वळून पाहिले नाही. मला यश मिळत गेले. पण कोणतीच गोष्टी सहजासहजी मिळत नाही. जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये आले तेव्हा मी फक्त 17 वर्षांची होते. मी अजून संपूर्ण जगदेखील बघितले नव्हते. 

5/9

चित्रपटातून बाहेर काढले

 Shilpa Shetty thrown out from movies now owns private jet

काही चित्रपटानंतर माझं करिअर एकदम थांबले. मी खूप प्रयत्न केले पण कुठे ना कुठे वाटत होतं मी मागे पडत आहे. मला अजूनही आठवते की काही निर्मात्यांनी मला कोणतेही कारण नसताना चित्रपटातून बाहेर काढले. 

6/9

बिग ब्रदर

 Shilpa Shetty thrown out from movies now owns private jet

 शिल्पा बिग ब्रदर शोमध्येही सहभागी झाली होती. तिथे तिच्यासोबत भेदभावाचाही सामना करावा लागला. मला पब्लिकली बुली करण्यात आले. तरीही मी हार मानली नाही.

7/9

राज कुंद्रासोबत लग्न

 Shilpa Shetty thrown out from movies now owns private jet

शिल्पाने म्हटलं होतं की, ज्यांनी वर्णभेदामुळा अपमान झेलला आहे. त्या सर्वांसाठी मी उभी राहिले. मी माझ्या आयुष्यात खूप चढ-उतार सोसले. अनेकदा कठिण प्रसंग आले मात्र त्यावर मात करत मी उभी राहिले. शिल्पाने व्यवसायिक राज कुंद्रासोबत लग्न केले आहे आणि ती दोन मुलांची आई आहे. 

8/9

134 कोटी

 Shilpa Shetty thrown out from movies now owns private jet

एका रिपोर्टनुसार, शिल्पा शेट्टी एकूण 134 कोटींच्या संपत्तीची मालकिण आहे. मुंबईतील लोकप्रिय रेस्टॉरंट Bastian हे शिल्पा शेट्टीचे आहे. 2019 मध्ये तिने या हॉटेल चेनची 50 टक्क्यांची भागीदारी खरेदी केली होती. त्याव्यतिरिक्त तिचा एक फॅशन ब्रँडदेखील आहे. फिटनेस अॅपच्या माध्यमातूनही तिला नफा मिळतो. 

9/9

राज कुंद्रा संपत्ती

 Shilpa Shetty thrown out from movies now owns private jet

राज कुंद्रा याची संपत्ती 3 हजार कोटी इतकी आहे. राज कुंद्रा याचे नाव ब्रिटिश आशियाई उद्योगपतींच्या यादीत आहे. तो ग्रुपको डेव्हलपर्स, टीएमटी ग्लोबल, विवान इंडस्ट्रीज, जेएल स्ट्रीम प्रायव्हेट लिमिटेडसारख्या अन्य कंपन्यांचा मालक आहे.