Surya Grahan 2023 : दुसऱ्या सूर्यग्रहणाला 5 राशींवर कोसळणार सूर्याचा प्रकोप! काळजी घ्या अन्यथा...

Next Surya Grahan 2023 : या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण आणि पहिलं चंद्रग्रहण झालं आहे. आता या वर्षातील दुसरं सूर्यग्रहण हे 5 राशींसाठी खूप धोकादायक ठरणार आहे.

नेहा चौधरी | May 22, 2023, 14:59 PM IST

Negative Impact Of Solar Eclipse 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला विशेष महत्त्व आहे. सूर्यग्रहण - चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. मात्र ग्रहण हे ज्योतिषशास्त्रात अशुभ मानलं जातं. या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण हे काही राशींसाठी अतिशय धोकादायक ठरणार आहे. (Second solar eclipse of the year Negative Impact for these zodiac signs Be careful surya grahan 2023)

1/7

कधी आहे दुसरं सूर्यग्रहण?

या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण हे 14 ऑक्टोबर 2023 ला असणार आहे. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण सकाळी 8.34 ते मध्यरात्री 2:25 पर्यंत असेल. 

2/7

'या' राशींवर कोसळणार सूर्याचा प्रकोप!

सूर्यग्रहणाचा 5 राशींवर वाईट परिणाम दिसून येणार आहे. मेष, वृषभसह अजून कोणत्या राशींनी सावध राहण्याची गरज आहे. 

3/7

मेष (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी दुसरं सूर्यग्रहण अतिशय धोकादायक असणार आहे. या लोकांना खूप सावध राहावं लागणार आहे. ओळखीच्या लोकांकडूनच तुमचा विश्वासघात होण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसानही होण्याची भीती आहे. 

4/7

वृषभ (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण अतिशय अशुभ सिद्ध होणार आहे. या लोकांना आर्थिक फटका बसणार आहे. मान सन्मानाला तडा जाणार आहे. तुम्हाला या काळात खूप काळजी घ्यायची गरज आहे. 

5/7

सिंह (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी सू्र्यग्रहण खर्चिक ठरणार आहे. त्यांना अनावश्यक खर्चाचा सामना करावा लागणार आहे. गुंतवणुकीतून आर्थिक फटका बसणार आहे. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या.

6/7

कन्या (Virgo)

कन्या राशीसाठी येणारं दुसरं सूर्यग्रहण अतिशय त्रासदायक ठरणार आहे. या काळात कोणाशीही वाद घालून नका अन्यथा मोठा फटका बसू शकतो. रागावर नियंत्रण ठेवा नाही तर मोठं संकट कोसळू शकतं. 

7/7

तूळ (Libra)

तूळ राशीच्या लोकांना दुसऱ्या सूर्यग्रहणाच्या वेळी अतिशय काळजी घ्यावी लागणार आहे. मानसिक आरोग्यावर परिणाम होईल. या काळात तुम्ही देवाची उपासना करा. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)