Sarkari Naukri : महाराष्ट्र शासनाकडून बंपर नोकरभरती; पाहा कशी असेल प्रक्रिया

Sarkari Naukri : म्हणूनच की काय, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विविध सरकारी खात्यांमध्ये नोकरी शोधण्यासाठी ही मंडळी प्रयत्नशील असतात.   

Apr 20, 2023, 08:16 AM IST

Sarkari Naukri : खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये कितीही गडगंड पगार असते, सुविधा असल्या तरीही सरकारी नोकरीची सर मात्र कुठेच येत नाही. अनेकांचच हेच म्हणणं. किंबहुना सध्याच्या तरुणाईला हे जास्तच पटतं. (sarkari naukri in maharashtra state government how to apply details job news )

1/7

महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा तत्सम परीक्षा

sarkari naukri in maharashtra state government how to apply details job news

या साऱ्याची सुरुवात होते ती म्हणजे एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा तत्सम परीक्षा देत चांगल्या हुद्द्याची नोकरी मिळवण्यापासून. 

2/7

नोकरीच्या शोधात आहात का?

sarkari naukri in maharashtra state government how to apply details job news

तुम्हीही अशाच एखाद्या नोकरीच्या शोधात आहात का? तर, महाराष्ट्र राज्य शासनाकडून तुम्हाला ही सुवर्णसंधी देण्यात येणार आहे. कारण, लाखोंच्या संख्येनं राज्यात नोकरभरती होणार आहे. 

3/7

1 लाख 45 हजार पदांची भरती

sarkari naukri in maharashtra state government how to apply details job news

सध्याच्या घडीला मिळालेल्या माहितीनुसार राज्यात 1 लाख 45 हजार पदांची भरती होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पदभरतीचा आढावा घेण्यात आला. 

4/7

विविध विभागांच्या मागण्या

sarkari naukri in maharashtra state government how to apply details job news

तूर्तास राज्य सेवेतील 75 हजार पदे भरण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. पण, प्रत्यक्षात मात्र विविध विभागांच्या मागणीनुसार ही पदसंख्या 1,45,000 वर गेली आहे. 

5/7

भरती प्रक्रिया पूर्ण

sarkari naukri in maharashtra state government how to apply details job news

यापेकी 6500 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे.  ऑगस्ट 2023 पर्यंत 75 हजार पदं भरली जातील, असंही सांगण्यात येत आहे. 

6/7

भरती प्रक्रियेला वेग

sarkari naukri in maharashtra state government how to apply details job news

भरती प्रक्रियेला वेग देण्यासाठी सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत न येणाऱ्या गट ब, क आणि ड संवर्गातील पदांसाठी ‘टीसीएस’ आणि ‘आयबीपी’ या कंपन्यांची निवड केली आहे. 

7/7

दांची भरती नियमित सुरू

sarkari naukri in maharashtra state government how to apply details job news

लोकसेवा आयोगाच्या परिघात येणाऱ्या पदांची भरती मात्र नियमित सुरू आहे. थोडक्यात येत्या काळात राज्यात अनेकांनाच सरकारी नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध असेल