महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक दरी; पावसाळ्यात इथं जाण म्हणजे मोठं थ्रील, एक पाऊल जरी चुकीचं पडलं तर...

Sandhan Valley Tourist Places in Maharashtra: आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांपैकी दुसऱ्या क्रमांकाची खोल दरी आपल्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेचे सौंदर्य पावसळ्यात आणखीच बहरेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत अनेक गड, किल्ले आणि दऱ्या ट्रेकर्सना आकर्षित करतात.  यापैकीच एक आहे ती सांधण व्हॅली (Sandhan Valley). ही खोल दरी ट्रेकर्ससह इतर भटक्यांनाही मोहात पाडते. मात्र, ही दरी तितकीच धोकादायक देखील आहे. पावसाळ्यात इथं ट्रेकिंगसाठी जाणे म्हणजे मोठ्या धाडसाचे काम आहे.   

| Jun 25, 2024, 12:19 PM IST
1/7

पावसळ्यात अनेक जण ट्रेकिंगचा बेत आखतात. मात्र, महाराष्ट्रात एक अत्यंत खतरनाक ठिकाण आहे. पावसाळ्यात इथं जाण म्हणजे मोठं थ्रील मानले जाते.  हे ठिकाण म्हणजे सांधण व्हॅली. 

2/7

अतिशय अरुंद घळ, कधी आठ-दहा फूट तर कधी अगदीच जेमतेम एक माणूस जाईल एवढी तीन फूट रुंदी आणि दोन्ही बाजूंना अंगावर येणाऱ्या 400 फूट उंच पाषाण कडा आहेत.

3/7

अहमदनगर जिल्ह्यातल्या साम्रद या गावातून सांधण व्हॅलीला जाण्याचा रस्ता आहे.   साम्रद या गावातून  पुढे दीड ते दोन किमी नागमोडी वळणे घेत जाणारी ही खोल दरी म्हणजे सांधण व्हॅली. 

4/7

 या दरीतून जाणारी चिंचोळी वाट पुढे इतकी निमुळती होत जाते की, कित्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहचत नाही. ही अत्यंत खोल दरी आहे. 

5/7

आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांमध्ये ‘सांधण व्हॅली’चा दुसरा क्रमांक लागतो. दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ 4 किमी लांबवर पसरलेली आहे. यामुळे येथे ट्रेकिंग करताना एक पाऊल जरी चुकीचं पडलं तर ट्रेकर्सच्या जीवावर बेतू शकते.   

6/7

एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग.  जमिनीला पडलेल्या या भेगेमुळेच निर्माण झालेली ही दरी निसर्गाचा अद्भुत चमत्कारच आहे.  

7/7

सांधण व्हॅलीला जाण्यासाठी पुण्यावरुन आळेफाटा-संगमनेर-अकोले-राजूर-शेंडी(भंडारदरा)-उडदावणे-साम्रद असा रस्ता आहे. मुंबईतून कल्याण-कसारा घाट-इगतपुरी-घोटी मार्गे तर नाशिकहूनही घोटीमार्गे येथे पोहचता येते.