Team India Squad: IPL स्टार्सवर बीसीसीआय मेहरबान, 'या' चार खेळाडूंची टीम इंडियात वर्णी
India Squad for Zimbabwe Tour 2024 : टी20 वर्ल्ड कपदरम्यान भारतीय क्रिकेट बोर्डाने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या 15 खेळाडूंची घोषणा केली आहे. या संघाची धुरा युवा सलामीवर शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या भारतीय क्रिकेट संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
1/7
2/7
या मालिकेसाठी बीसीसीआये 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली असून याची कमान युवा सलामीवीर शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळणाऱ्या टीम इंडियातील सर्व सीनिअर खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या चार खेळाडूंना टीम इंडियात संधी देण्यात आली आहे.
3/7
आयपीएलच्या सतराव्या हंगामात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं तर सनरायजर्स हैदराबादचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माने. आयपीएलमध्ये हैदराबादसाठी सलामीला फलंदाजी करताना अभिषेक शर्माने गोलंदाजांची अक्षरश: धुलाई केली होती. जवळपास सर्वच सामन्यात अभिषेकने चौकर-षटकारांची बरसात केली. आयपीएल 2024 च्या 16 सामन्यात अभिषेकने 200 हून अधिकच्या स्ट्राईक रेटने 484 धावा केल्या. याच कामगिरीच्या जोरावर अभिषेकचं टीम इंडियामध्ये खेळण्याचं स्वप्न साकार झालंय.
4/7
5/7
22 वर्षांच्या रियान परागचं यंदाच्या आयपीएलमध्ये विशेष कौतुक झालं. राजस्थान रॉयल्सला प्ले ऑफमध्ये पोहोचवण्यात रियान परागचं विशेष योगदान होतं.. मधल्या फळीत फलंदाजी करताना रियान परागने राजस्थानला अनेक सामन्यात विजय मिळवून दिलाय. रियानने आयपीएल 2024 मध्ये 15 सामन्यात 573 धावा केल्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रियान तिसऱ्या क्रमांकावर होता.
6/7