भारताची फुलराणी PV Sindhu अडकली लग्नबंधनात, उदयपूरमध्ये झालेल्या ग्रँड लग्नाचे Photos समोर

PV Sindhu Wedding Photos : भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधू रविवारी व्यंकट दत्ता साई याच्या सोबत लग्न बंधनात पडली. उदयपूर येथे दोघांच्या ग्रँड लग्नाचे फोटो समोर आले आहेत. 

Pooja Pawar | Dec 23, 2024, 11:56 AM IST
1/8

भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूच लग्न 22 डिसेंबर रोजी उदयपूर येथील सागर तलावावर असलेल्या राफेल हॉटेलमध्ये झाले. या ग्रँड लग्नाला अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. 20 तारखेपासून उदयपूर येथे सिंधू आणि व्यंकट यांच्या लग्नाचे विविध कार्यक्रम सुरु होते. 

2/8

पीव्ही सिंधूचा पती व्यंकट दत्ता साई हा साई पोसाइडेक्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक आहे. सिंधूचे वडील पीव्ही रमणा यांनी पीटीआयला सांगितले की, "दोन्ही कुटुंबे एकमेकांना ओळखत होती पण एक महिन्यापूर्वीच सर्व काही ठरले होते. ही एकमेव वेळ होती कारण जानेवारीपासून सिंधूचे वेळापत्रक खूप व्यस्त असणार आहे".

3/8

पीव्ही सिंधूने तिच्या लग्न सोहोळ्यासाठी पीएम नरेंद्र मोदी,  सचिन तेंदुलकर, तेलंगणा मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री सीएम एन. चंद्रबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण सह बऱ्याच दिग्गजांना आमंत्रण दिले होते. यापैकी काहींनी उदयपूर येथील लग्नाला हजेरी देखील लावली. 

4/8

काहीच दिवसांपूर्वी पीव्ही सिंधूचा साखरपुडा देखील झाला होता. याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार ज्या ठिकाणी सिंधूचे लग्न झाले त्या ठिकाणी क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि त्याची पूर्व पत्नी नताशाचे सुद्धा लग्न झाले होते. 

5/8

उदयपूर येथे झालेल्या ग्रँड लग्नामध्ये राजस्थानी शैलीत सजावट करण्यात आली होती. तसेच जेवणात देखील राजस्थानी, मेवाड, दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय पदार्थांचा समावेश होता. 

6/8

पीव्ही सिंधू आणि व्यंकट दत्ता साई यांच्या लग्नाचं रिसेप्शन 24 डिसेंबर रोजी हैद्राबाद येथे होणार आहे. या ग्रँड रिसेप्शनला अनेक खेळाडू, सेलिब्रिटीज नवं जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.  

7/8

सिंधू ही भारतातील सर्वात दिग्गज खेळाडूंपैकी एक मानली जाते जिने 2019 मध्ये सुवर्णासह जागतिक स्पर्धेत पाच पदके जिंकली आहेत. याशिवाय त्याने ऑलिम्पिक स्पर्धेतही रौप्य आणि कांस्यपदक जिंकले आहेत. चॅम्पियन बॅडमिंटनपटूने रिओ 2016 आणि टोकियो 2020 मध्ये सलग ऑलिम्पिक पदके जिंकली आणि 2017 मध्ये करिअर-सर्वोत्तम जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान मिळवले.  

8/8

पीव्ही सिंधू ही जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंपैकी एक आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, पीव्ही सिंधूची कमाई सुमारे 7.1 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयांमध्ये सुमारे 60 कोटी रुपये आहे. पीव्ही सिंधूची कमाई 2018 मध्ये $8.5 दशलक्ष, 2019 मध्ये $5.5 दशलक्ष, 2021 मध्ये $7.2 दशलक्ष आणि 2022-2023 मध्ये $7.1 दशलक्ष होती.