Samudrayaan: कसे असेल 'मत्स्य 6000' मिशन? कसले करणार संशोधन? सर्वकाही जाणून घ्या

MATSYA 6000:समुद्रयानचे 'मत्स्य 6000 मिशन' हे पाण्याच्या खोलवर जाऊन निकेल, कोबाल्ट, मॅंगनीज, हायड्रोथर्मल सल्फाइड्स आणि गॅस हायड्रेट्स शोधणार आहे.

Pravin Dabholkar | Sep 12, 2023, 09:47 AM IST

Samudrayaan:आता समुद्राच्या खोलात दडलेली रहस्ये जाणून घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे भारताकडून लवकरच आपल्या 'समुद्रयान' मोहिमेची चाचणी सुरू केली जाणार आहे. 

1/9

Samudrayaan: कसे असेल 'मत्स्य 6000' मिशन? कसले करणार संशोधन? सर्वकाही जाणून घ्या

Samudrayan How will work Matsya 6000 mission What kind of research Launched Date Know everything

Samudrayaan mission:चांद्रयान-3 आणि आदित्य एल 1 च्या यशानंतर इस्रोचे जगभरातून कौतुक होत आहे. चांद्रयान मोहिमेतून चंद्राची अनेक रहस्ये समोर येत आहेत. तर आदित्य-L1ने सूर्याची  रहस्ये जाणून घेण्यासाठी उड्डाण घेतले आहे. या पार्श्वभूमीवर आता समुद्राच्या खोलात दडलेली रहस्ये जाणून घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे भारताकडून लवकरच आपल्या 'समुद्रयान' मोहिमेची चाचणी सुरू केली जाणार आहे. 

2/9

कसे असेल मिशन समुद्रयान?

Samudrayan How will work Matsya 6000 mission What kind of research Launched Date Know everything

समुद्रयानमध्ये तीन लोकांचा समावेश असेल. हे तिघेजण स्वदेशी पाणबुडीमध्ये 6,000 मीटर खोलीपर्यंत जातील. 'मत्स्य 6000' असे या सबमर्सिबलचे नाव आहे. 

3/9

धातूंचा शोध

Samudrayan How will work Matsya 6000 mission What kind of research Launched Date Know everything

मत्स्य 6000 चे क्रू समुद्रतळाच्या 6 हजार किलोमीटर खाली कोबाल्ट, निकेल आणि मॅंगनीज सारख्या मौल्यवान धातूंचा शोध घेणार आहे. मत्स्य 6000 तयार करण्यासाठी सुमारे दोन वर्षे लागली. 

4/9

समुद्रयान कधी पाठवणार?

Samudrayan How will work Matsya 6000 mission What kind of research Launched Date Know everything

समुद्रयान 2024 च्या सुरुवातीला चेन्नईच्या किनाऱ्यावरून बंगालच्या उपसागरात सोडले जाणार आहे. इतक्या खोल समुद्रात जाणे हे खूपच आव्हानात्मक असणार आहे. पण इस्रोच्या चांद्रयान 3 आणि आदित्य एल 1 नंतर  देशाचा आत्मविश्वास वाढला आहे. 

5/9

पहिल्या तिमाहीत 500 मीटर खोलीवर

Samudrayan How will work Matsya 6000 mission What kind of research Launched Date Know everything

'समुद्रयान मोहीम खोल महासागर मोहिमेचा भाग म्हणून सुरू होणार असून 2024 च्या पहिल्या तिमाहीत 500 मीटर खोलीवर सागरी चाचण्या घेणार असल्याची माहिती  पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन यांनी द टाइम्स ऑफ इंडियाला दिली.

6/9

कसले करणार संशोधन?

Samudrayan How will work Matsya 6000 mission What kind of research Launched Date Know everything

समुद्रयानचे 'मत्स्य 6000 मिशन' हे पाण्याच्या खोलवर जाऊन निकेल, कोबाल्ट, मॅंगनीज, हायड्रोथर्मल सल्फाइड्स आणि गॅस हायड्रेट्स शोधणार आहे. मत्स्या 6000 हायड्रोथर्मल व्हेंट्स आणि समुद्रातील कमी-तापमान मिथेन सीप्समधील केमोसिंथेटिक जैवविविधतेची तपासणीदेखील करणार आहे. 

7/9

कसे आहे मत्स्य 6000?

Samudrayan How will work Matsya 6000 mission What kind of research Launched Date Know everything

मत्स्य 6000 चे वजन 25 टन आहे. त्याची लांबी 9 मीटर आणि रुंदी 4 मीटर आहे. मत्स्य 6000 साठी 2.1 मीटर व्यासाचा गोल डिझाइन आणि विकसित केला आहे. यामध्ये तीन लोक असतील.

8/9

96 तास ऑक्सिजन पुरवठा

Samudrayan How will work Matsya 6000 mission What kind of research Launched Date Know everything

6,000 मीटर खोलीवर 600 बार दाब (समुद्र सपाटीवरील दाबापेक्षा 600 पट जास्त) सहन करण्यासाठी हा गोल 80 मिमी जाड टायटॅनियम मिश्र धातुपासून बनविला जाईल. हे वाहन 12 ते 16 तास सतत चालण्यासाठी डिझाइन केलेले आहे. यामध्ये ऑक्सिजन पुरवठा 96 तास उपलब्ध असणार आहे.

9/9

आतापर्यंत कोणत्या देशांचे संशोधन?

Samudrayan How will work Matsya 6000 mission What kind of research Launched Date Know everything

2026 पर्यंत समुद्रयान मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत फक्त अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स आणि चीनने मानवांना वाहून नेण्यासाठी सबमर्सिबल विकसित केले आहे.