सुट्ट्या शिल्लक असलेले नोकरदार मालामल होणार; देशात चार नवे कायदे आणि कामगार नियमांमध्ये मोठे बदल

 देशात चार नवे कामगार कायदे लागू केले जाण्याची शक्यता आहे. या कायद्यानुसार 30 पेक्षा जास्त सुट्ट्या शिल्लक राहिल्यास कर्मचा-यांना त्या एनकॅश करून घेता येतील.   

Sep 11, 2023, 23:02 PM IST

labour law leave encashment : नोकरदारवर्गासाठी सुट्टीचे नियम आणि लिव्ह एनकॅश पॉलिसी हा नेहमीच कळीचा मुद्दा राहिलाय. एकतर वर्षभरात पुरेपुर सुट्टी मिळत नाही आणि सुट्ट्या शिल्लक राहिल्या तर त्याचे पैसेही मिळत नाहीत. मात्र आता सुट्ट्यांची चिंता सोडा, कारण सुट्ट्यांमधून बक्कळ पैसे कमवायचा मार्ग मोकळा होणार आहे.

 

1/7

नोकरदारवर्गासाठी सुट्टीचे नियम आणि लिव्ह एनकॅश पॉलिसी हा नेहमीच कळीचा मुद्दा राहिलाय. एकतर वर्षभरात पुरेपुर सुट्टी मिळत नाही आणि सुट्ट्या शिल्लक राहिल्या तर त्याचे पैसेही मिळत नाहीत. 

2/7

आता सुट्ट्यांची चिंता सोडा, कारण सुट्ट्यांमधून बक्कळ पैसे कमवायचा मार्ग मोकळा होणार आहे.

3/7

 ही नियमावली अद्यापही कागदावरच आहे. जोवर याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही तोवर तुमच्या सुट्ट्या एनकॅश होणार नाहीत.

4/7

नव्या कायद्यानुसार या रजा लॅप्स होण्याची शक्यता कमी आहे. अनेक संस्था शिल्लक रजा इनकॅश करण्याची परवानगी देत नाहीत. मात्र नव्या कायद्यानुसार ही पळवाट बंद होईल.

5/7

2020 च्या कामगार कायद्यानुसार 30 हून अधिक पगारी रजा शिल्लक असल्यास त्या इनकॅश केल्या जाऊ शकतात किंवा पुढील वर्षात फॉरवर्ड होतात. 

6/7

30 पेक्षा जास्त पगारी रजा शिल्लक राहिल्यास कंपनीला त्या 30 दिवसांचा पगार कर्मचा-याला द्यावा लागेल.

7/7

नव्या कामगार कायद्यांतर्गत कोणताही कर्मचारी एका कॅलेंडर वर्षात 30 पेक्षा जास्त पगारी रजा जमा करू शकत नाही.