'...म्हणून देवाचा फेव्हरेट आहे सलमान खान!' ही कामगिरी करणारा 'भाईजान' पहिलाच भारतीय
What is Bone Marrow : सलमान खानने चिमुकलीला बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणारा पहिला भारतीय ठरा आहे. बोन मॅरो म्हणजे काय आणि ते कसं ट्रान्सप्लांट करता येतं.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान आपल्या अभिनयासोबतच त्याचा दानशूरपणामुळे देखील ओळखला जातो. सलमान खानने बोन मॅरो डोनेट करुन एका लहान मुलीचा जीव वाचवला आहे. 2010 मध्ये सलमान खानने मॅरो डोनर रजिस्ट्री इंडिया (MDRI) आपलं नाव रजिस्टर केलं आहे. सलमान खानने स्वतः दिलेल्या माहितीनुसार, त्याने एका मुलीबद्दल वाचलं होतं जिला बोन मॅरो ट्रान्सप्लांटची गरज आहे.
1/7
सलमानने यावेळी आपल्या फुटबॉल टीमला याबाबत सांगून डोनेट करण्यास सांगितले. पण शेवटच्या क्षणी प्रत्येकजण नाही म्हणाले. तेव्हा फक्त सलमान आणि त्याचा भाऊ अरबाज खान राहिले. ज्यांनी बोन मॅरो डोनेट केले. भारतात फार कमी लोकं बोन मॅरो डोनेट करतात. यामुळे सलमान खानने सगळ्यांना आवाहन केलं आहे. बोन मॅरो डोनेशनच्या समस्यांबद्दल बोलताना सलमान म्हणाला की, सध्या आमच्याकडे फक्त 5000 डोनर आहेत. हे केवळ जागरूकतेचा अभाव नाही तर आपली वृत्ती देखील एक समस्या आहे. त्यामुळे रुग्णांच्या जीवनावर परिणाम होतो. बोन मॅरो दान करून तुम्ही एक जीव वाचवू शकता. हे रक्त तपासणीइतके सोपे आहे आणि जास्त वेळ लागत नाही. मला माहित आहे की, काही लोक रक्ताच्या चाचण्यांना घाबरतात, परंतु आता थोडे धाडसी निर्णय घेऊन समाज बदलण्याची गरज आहे.
2/7
बोन मॅरो म्हणजे काय?
3/7
बोन मॅरो का महत्त्वाचं?
Cleveland Clinic (ref) नुसार शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि त्याच्या चांगल्या कार्यासाठी अस्थिमज्जा खूप महत्वाचा आहे. हे लाल रक्तपेशी (RBC) तयार करण्याचे काम करते, जे शरीरात ऑक्सिजन पोहोचवते. हे पांढऱ्या रक्त पेशी (WBC) देखील बनवते, जे शरीराचे संरक्षण करते. हे प्लेटलेट्स तयार करण्यासाठी देखील महत्वाचे आहे, जे रक्त गोठण्यास मदत करते.
4/7
याच्या कमतरेमुळे काय फरक पडतो?
5/7
कमतरतेची लक्षणे काय?
थकवा आणि अशक्तपणा: रक्तपेशींच्या कमतरतेमुळे शरीराच्या अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. त्वचा पिवळी पडणे: रक्तातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे त्वचा पिवळी पडते. श्वास घेण्यात अडचण: जेव्हा शरीराच्या अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा श्वास घेण्यास त्रास होतो. वारंवार होणारे संक्रमण: पांढऱ्या रक्त पेशी शरीराला संसर्गापासून वाचवतात. त्यांच्या कमतरतेमुळे वारंवार संसर्ग होण्याचा धोका वाढतो. रक्तस्त्राव: प्लेटलेट्स रक्त गोठण्यास मदत करतात. त्यांच्या कमतरतेमुळे, लहान जखमांमधूनही जास्त रक्तस्त्राव होतो. ताप: वारंवार संसर्ग झाल्यामुळे ताप येऊ शकतो.
6/7
कमतरतेमुळे काय होऊ शकतं?
कर्करोग: अस्थिमज्जाचा कर्करोग (ल्युकेमिया) हे सर्वात सामान्य कारण आहे. ऍप्लास्टिक ॲनिमिया: यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती अस्थिमज्जा नष्ट करते. मायलोफिब्रोसिस: यामध्ये, बोन मॅरोमध्ये तंतुमय ऊतक वाढते. जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता: काही जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या कमतरतेमुळे बोन मॅरोवरही परिणाम होऊ शकतो. काही औषधांचे दुष्परिणाम: काही औषधे अस्थिमज्जाला हानी पोहोचवू शकतात.
7/7