सेल्स गर्ल ते अर्थमंत्रीः जेएनयूत जुळलं प्रेम, सासरवाडी काँग्रेस समर्थक; सीतारमण यांच्याबद्दल तुम्हाला किती माहिती?

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला. सातवा अर्थसंकल्प सादर करुन त्यांनी आजपर्यंत अनेक विक्रम केले आहेत. सेल्स गर्ल ते अर्थमंत्री असा त्यांच्या प्रवासावर एक नजर टाकूयात. 

नेहा चौधरी | Jul 23, 2024, 11:52 AM IST
1/8

निर्मला सीतारामन यांचा जन्म 18 ऑगस्ट 1959 मध्ये मदुराईमधील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील रेल्वेत होते तर आई गृहिणी होत्या. तिरुचिरापल्लीमधील सीतालक्ष्मी रामास्वामी महाविद्यालयातून अर्थशास्त्राचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दिल्लीतील जेएनयूमधून पदव्युत्तर आणि एम.फिल केलं. 

2/8

दिल्लीतील जेएनयूमध्ये त्यांची भेट परकला प्रभाकर यांच्याशी झाली. आधी मैत्री आणि मग प्रेम, पण कुटुंब या नात्याचा विरोधात होतं. अखेर मुलांच्या आनंदासाठी कुटुंबाने संमती दिली आणि 1986 त्यांनी लग्न केलं.   

3/8

लग्नानंतर निर्मला सीतारमण पतीसोबत लंडनला गेल्या. तिथे त्यांना रीजेंट स्ट्रीटमधील होम डेकोरच्या दुकानात सेल्स गर्ल म्हणून नोकरी मिळाली. यानंतर त्यांनी काही दिवस BCC वर्ल्ड सर्व्हिसमध्ये काम केलं. मग ऑडिट फर्म प्राइस वॉटरहाउस कूपर्समध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली.  

4/8

अर्थमंत्री निर्मला सीतारमण या भाजपच्या हुशार आणि गतिमान नेत्यांपैकी एक मानल्या जातात. पण फार कमी लोकांना माहीत आहे की त्यांचे काँग्रेसी कुटुंबात लग्न झालं. त्यांचे सासू-सासरे दोघेही काँग्रेसमध्ये होते. सीतारमण यांच्या सासूबाई आंध्र प्रदेशमधून काँग्रेसच्या आमदार आहेत, तर त्यांचे सासरे मंत्री होते. 

5/8

निर्मला सीतारामन 1990 मधून परदेशातू भारतात परतल्या. 2008 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2 वर्षांत त्यांनी सुषमा स्वराज यांच्यानंतर पक्षाच्या दुसऱ्या महिला प्रवक्त्या म्हणून मान मिळवला. टीव्ही डिबेट शोमध्ये त्या एक प्रसिद्ध चेहरा बनल्यात. 

6/8

2014 मध्ये त्यांना मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर त्या पहिल्या अर्थ राज्यमंत्री झाल्यात. 2017 मध्ये त्यांना देशाचे संरक्षण मंत्री बनण्याचा मान मिळाला होता. 2019 मध्ये त्यांना अर्थमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. 

7/8

निर्मला सीतारामन यांनी मोदी 3.0 मध्ये मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अनेक विक्रम केलंय. मोदी सरकारच्या सलग तिसऱ्यांदा मंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. यासह त्यांनी अर्थमंत्री म्हणून पूर्ण कार्यकाळ पूर्ण करून माजी अर्थमंत्री अरुण जेटली आणि मनमोहन सिंग यांची बरोबरी केलीय.  

8/8

2017 मध्ये त्यांनी पहिल्या महिला संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करून एक नवीन विक्रम केला. तर स्वतंत्र भारतातील पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री होण्याचा विक्रम निर्मला सीतारमण यांच्या नावावर आहे. तसंच सलग सहावा अर्थसंकल्प सादर करून त्यांनी विक्रम केला. आतापर्यंत हा विक्रम फक्त माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर होता. त्याशिवाय सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करून ती आणखी एक पाऊल पुढे टाकलं. मात्र, सर्वाधिक 10 अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे.