Rutuja Latke : मातोश्रीवर ऋतुजा लटकेंचे असे झाले जंगी स्वागत फोटो आले समोर

नवनिर्वाचित आमदार ऋतुजा लटकेंनी मातोश्रीवर घेतली पक्षप्रमुख ठाकरेंची भेट

Nov 06, 2022, 17:56 PM IST

प्रतिक्षा बनसोडे, झी मीडिया, मुंबई : राज्यातील बहुचर्चित अशा अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीचा (Andheri  bypoll election) निकाल हाती आला आहे. या निकालात ठाकरेंच्या सेनेचे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) अधिकृत उमेदवार ऋतुजा लटके(Rutuja latke) यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणूकीत लटकेंना ६६ हजार 274 मते पडली आहेत. विधानसभा पोटनिवडणूकीच्या विजयानंतर ऋतुजा लटके यांनी मातोश्रीवर(Matoshree) जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. मातोश्रीवरील या भेटीचे फोटो आता समोर आलेले दिसतायत या फोटोमध्ये शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) सुद्धा पाहायला मिळतात. 

 

1/5

ऋतुजा लटकेंना रश्मी ठाकरेंनी ओवाळले

Rutuja Latke and Rashmi Thackeray

मातोश्रीवर नवनिर्वाचित उमेदवार ऋतुजा लटके यांचे रश्मी ठाकरेंनी ओवाळून स्वागत केले. 

2/5

ऋतुजा लटकेंनी घेतली पक्षप्रमुखांची भेट

Rutuja Latke and uddhav thackeray

 ठाकरेंच्या शिवसेनेचे अधिकृत चिन्ह मशालीवर निवडणुक लढवणाऱ्या ऋतुजा लटके या पहिल्या उमेदवार ठरल्या आहेत. 

3/5

उद्धव ठाकरेंच्या हाती 'विजया'ची मशाल

uddhav thackeray And Aditya Thackeray

विजयानंतर मशाल चिन्ह हाती पकडताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळते. 

4/5

आदित्य आणि परबांनी मशालीची धुरा सांभाळली

Anil Parab And Aditay Thackeray

या पोटनिवडणूकीच्या मैदानात अनिल परब आणि आदित्य ठाकरे कायम आक्रमकरित्या प्रचारासाठी उतरलेले पाहायला मिळाले

5/5

ठाकरेंनी मानले शिवसैनिकांचे आभार

Udddhav Thackeray And Shivsainik

'धनुष्यबाण' गेल्यानंतर 'मशाल' या चिन्हावर ठाकरेंच्या सेनेनी मिळवलेल्या विजयानंतर  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांचे आभार मानताना पाहायला मिळतात.