PHOTO : 38 वर्षीय 'या' अभिनेत्रीच्या तिजोरीत आहे 67 किलो सोने-चांदी; नेट वर्थ आहे 91,00,000,00 रुपये, कोण आहे ही अभिनेत्री?

| Jan 16, 2025, 18:34 PM IST
1/7

आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल ती सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनयासोबत तिने राजकीय प्रवासही सुरु केलाय. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून कंगना रणौत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये निवडणूक जिंकून अभिनेत्री आज खासदार आहे. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी ती दोन्ही करिअर सांभाळत आहे. लवकरच ती 'इमर्जन्सी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

2/7

मंडीची खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत चित्रपटसृष्टीतून येऊन 19 वर्षांचा कालावधी उलटलाय. या काळात तिने ती वेगवेगळ्या शैलींमध्ये आणि वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्यात. पण तरीही अभिनेत्री विशेष छाप सोडू शकली नाही. 2015 मध्ये तिचा 'तनू वेड्स मनु रिटर्न्स' सुपरहिट झाला होता आणि 'मणिकर्णिका'ही हिट ठरला होता. याशिवाय 'कट्टी बट्टी', 'रंगून', 'सिमरन', 'जजमेंटल है क्या', 'पंगा', 'थलाईवी', 'धाकड' आणि 'तेजस' असे 11 चित्रपट फ्लॉप ठरले आहेत.

3/7

आता अभिनेत्रीच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर 91 कोटींची मालकीण आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात तिने हा खुलासा केला आहे. त्या तिने आपलं शिक्षण बारावी पर्यंत झाल्याच सांगितलंय. त्याच्याकडे 6 किलो 700 ग्रॅम सोने असून त्याची किंमत 5 कोटी रुपये आहे. तिजोरीत 60 किलो चांदीदेखील आहे. 

4/7

एलआयसीच्या 50 पॉलिसींशिवाय कंगना रणौतने 1.56 कोटी रुपयांच्या BMW 7-Series आणि Mercedes Benz GLE SUV सारख्या गाड्या आहेत. घर आणि बंगल्याबद्दल बोलायचं झालं तर तिच्याकडे मुंबईत एक अपार्टमेंट आणि मनालीमध्ये त्याचा एक आलिशान बंगला आहे. ज्याची किंमत 25 कोटी रुपये आहे.

5/7

कंगना रणौत हिमाचल प्रदेशची रहिवासी असून ती राजपूत कुटुंबातून येते. तिची आई आशा रणौत या शाळेत शिक्षिका आहेत आणि वडील अमरदीप रणौत हे व्यापारी आहेत. कंगनाला रंगोली चंदेल नावाची एक बहीण देखील आहे. याशिवाय कंगनाला एक लहान भाऊही आहे. कंगनानेही अनेक मुलाखतींमध्ये स्वत:ला हट्टी असल्याचे सांगितलंय. तिच्या अभिनय आणि राजकारणासाठी तिला केवळ प्रशंसाच मिळत नाही, तर ती सौंदर्यातही अप्रतिम आहे.  

6/7

अभिनेत्रीचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट 17 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. मात्र त्यापूर्वीच या चित्रपटाला प्रचंड विरोधाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (SGPC) पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांना पत्र लिहून चित्रपटाला विरोध दर्शविलाय.  

7/7

त्याचबरोबर बांगलादेशमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. हा चित्रपट बांगलादेशात प्रदर्शित होणार नाही. कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट 1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतात घोषित केलेल्या आणीबाणीवर आधारित आहे.