Romantic Date साठी जागा शोधताय? मुंबईतील 'या' 15 ठिकाणांचा एकदा विचार कराच

Romantic Places In Mumbai For Couple Date: आपल्या जोडीदाराबरोबर डेट म्हणून सतत वेगवेगळे हॉटेल, सिनेमागृहांना जाऊन तुम्ही कंटाळला आहात का? मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्ही जोडीदाराबरोबर एकांत आणि काही निवांत क्षण घालवण्यासाठी छान जागा शोधत आहात का? याचं उत्तर हो असेल तर ही गॅलरी तुमच्या अनेक शंकांचं समधान करु शकते. अगदी निसर्गाच्या सानिध्यातील जागांपासून हटके रेस्तराँपर्यंत आणि नाटकांपासून ते लाँग ड्राइव्हपर्यंतचे वेगवेगळे डेट्सचे पर्याय कोणते आहेत हे आपण यात पाहणार आहोत. चला तर मग निघूयात या रोमँटिक भटकंतीवर...

Swapnil Ghangale | Aug 10, 2023, 14:07 PM IST
1/16

Romantic Places In Mumbai For Couple Date

मरीन ड्राइव्ह (Marine Drive) - मुंबईमधील सर्वात आयकॉनिक जागा म्हणून मरीन ड्राइव्हचं नाव घेतलं जातं म्हणून ही यादीसुद्धा इथूनच सुरु करुयात. नजर जाईल तिथपर्यंत समुद्र, मुंबईतील उंच उंच इमारती हे दृष्य डोळ्यात साठवत इथं बसून सूर्यास्त पाहण्यासारखं दुसरं सुख नाही हे खऱ्या मुंबईकराला नक्कीच ठाऊक असेल.

2/16

Romantic Places In Mumbai For Couple Date

वर्सोवा रॉक बीच (Versova Rock Beach) - अंधेरीमधील वर्सोवा रॉक बीच ही मुंबईतील फार सुंदर आणि रोमँटीक जागांपैकी एक आहे. 2.7 किलोमीटरचा समुद्रकिनारा एकदा तरी पाहायला हवाच असा आहे. या ठिकाणी गर्दीही कमी असते.

3/16

Romantic Places In Mumbai For Couple Date

कुलाबा कॉझवे (Colaba Causeway) - गेट वे ऑफ इंडिया, ताज हॉटेल यासारख्या आयकॉनिक जागा पाहण्याबरोबरच या ठिकाणी असलेल्या रेस्तराँमध्ये वेगवेगळे पदार्थ नक्कीच जोडीदाराबरोबर ट्राय करता येतील. या ठिकाणी तुम्हाला शॉपिंगही करता येईल.

4/16

Romantic Places In Mumbai For Couple Date

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (Sanjay Gandhi National Park) - आपल्या जोडीदाराबरोबर निसर्गरम्य ठिकाणी पण अगदी हाकेच्या अंतरावर जायचं असेल तर बोरीवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचा नक्की विचार करा. एकूण 104 एकरांवर हे उद्यान पसरलेलं आहे. 

5/16

Romantic Places In Mumbai For Couple Date

पृथ्वी थेअरटर (Prithvi Theatre) - नाटकं, कार्यक्रम, म्युझिक कॉनसर्टची आवड असेल तर तुम्ही 1975 सालांपासून मुंबईकरांच्या सेवेत असलेल्या पृथ्वी थेअरटरचा विचार नक्कीच करु शकता. येथील वातावरण फारच मोहून टाकणारं आहे. येथील पृथ्वी कॅफेमध्ये उत्तम पदार्थ मिळतात.

6/16

Romantic Places In Mumbai For Couple Date

छोटा काश्मीर (Chhota Kashmir) - छोटा काश्मीर गोरेगावमध्ये आहे. आरे मिल्क कॉलीनीमधील ही शहरामध्येच निसर्गाचा आनंद घेण्यासाठी उत्तम आहे. या ठिकाणी असलेल्या तलावात बोटींगचा आनंद घेता येईल.

7/16

Romantic Places In Mumbai For Couple Date

मढ आयलंड समुद्रकिनारा (Madh Island Beach) - मुंबईमधील सर्वात स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणजे मढ आयलंड समुद्रकिनारा! जोडीदाराबरोबर काही निवांत क्षण घालवण्यासाठी ही उत्तम जागा आहे.

8/16

Romantic Places In Mumbai For Couple Date

अर्नाळा समुद्रकिनारा (Arnala Beach) - मुंबईपासून 60 किलोमीटर अंतरावर अर्नाळा समुद्रकिनारा आहे. निवांत समुद्रकिनारा, शांतता आणि एकमेकांबरोबर काही रोमँटिक क्षण घालवण्यासाठी हा उत्तम जागा आहे.

9/16

Romantic Places In Mumbai For Couple Date

कार्टर रोड (Carter Road) - वांद्र्यामधील प्रसिद्ध बॅण्डस्टॅण्डपासून हाकेच्या अंतरावर असलेला कार्टर रोड हा जोडप्यांसाठी अगदी उत्तम जागा आहे. मिनी गोव्याचा फील तुम्हाला इथे फिरताना मिळाले. येथे अनेक छान रेस्तराँ आहेत.

10/16

Romantic Places In Mumbai For Couple Date

रेनफॉरेस्ट रेस्तराँ-बार (Rainforest Resto-Bar) - काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर नवी मुंबईतील बेलापूर सीबीडीमधील रेनफॉरेस्ट रेस्तराँ-बारला नक्की भेट द्या. अगदी वेगळ्याच पद्धतीची हा हॉटेलची थीम असल्याने येथे प्रवेश केल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

11/16

Romantic Places In Mumbai For Couple Date

एस्टेला (Estella) - जुहूमधील एस्टेला हॉटेलमध्येही तुम्ही छान रोमँटिक डेटला जाऊ शकता. हे हॉटेल थोडं महागडं आहे मात्र येथील सी फूड, एकंदरित वातावरण आणि समोर दिसणारा समुद्र फारच सुंदर आहे.

12/16

Romantic Places In Mumbai For Couple Date

कर्नाळा किल्ला (Karnala Fort) - ट्रेकिंग आणि निसर्गामध्ये भटकंती करण्याची आवड असेल तर पनवेलपासून अवघ्या 10 किलोमीटवर असलेल्या कर्नाळा किल्ल्याला तुम्ही भेट देऊ शकता. पावसाळ्यामध्ये या किल्ल्याला भेट देणं सुखद अनुभव असतो.

13/16

Romantic Places In Mumbai For Couple Date

एईआर रुफटॉप बार (AER Rooftop Bar) - अधिक बजेट असेल आणि काहीतरी हटके ट्राय कराचं असेल तर वरळीमधील फोर सिझन्सच्या एईआर रुफटॉप बारला तुम्ही भेट देऊ शकता. खिसा हलका करावा लागेल पण अनुभव हा नक्कीच कायम लक्षात राहणार असेल.

14/16

Romantic Places In Mumbai For Couple Date

रॉयल ओपेरा हाऊस (Royal Opera House)- नाटकं, कार्यक्रम, म्युझिक कॉनसर्टची आवड असेल तर तुम्ही जोडीदाराबरोबर रॉयल ओपेरा हाऊसला भेट देऊ शकता. गिरगावमधील मामा परमानंद मार्गावर रॉयल ओपेरा हाऊस आहे.

15/16

Romantic Places In Mumbai For Couple Date

कॅनव्हास लाफ्टर क्लब (Canvas Laugh Club) - तुम्हाला युट्यूबवर स्टॅण्डअप कॉमेडी पाहण्याची आवड असेल तर तुमच्या जोडीदाराबरोबर प्रत्यक्षात याचा आनंद घेण्यासाठी कॅनव्हास लाफ्टर क्लबला नक्की भेट द्या. लोअर परळमधील पॅलाडीयम मॉलमध्ये हे क्लब आहे.

16/16

Romantic Places In Mumbai For Couple Date

सॉल्ट रेस्तराँ, कर्जत (Saltt Karjat) - मुंबईपासून थोडं लांब लाँग ड्राइव्ह पद्धतीच्या डेटचा विचार करत असाल तर तुम्ही कर्जतच्या सॉल्ट रेस्तराँला नक्की जा. निसर्ग सौंदर्याचा पुरेपुर आनंद आपल्या जोडीबरोबर घेण्यासाठी ही उत्तम जागा आहे.