IND vs ENG: रोहित शर्माच्या अडचणी वाढल्या; विराटनंतर 'हा' खेळाडू दुखापतीमुळे बाहेर?

IND vs ENG: भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये 25 जानेवारीपासून पहिला टेस्ट सामना खेळवला जाणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये हा सामना रंगणार आहे. 

| Jan 24, 2024, 11:27 AM IST
1/7

या सिरीजच्या पहिल्या दोन सामन्यांमधून विराट कोहलीने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्याने टीम इंडियाला एक धक्का बसला आहे. 

2/7

तर विराट कोहलीनंतर टीम इंडियाला अजून एक धक्का बसला आहे. 

3/7

टीम इंडियाचा मिडल ऑर्डरमधील फलंदाज श्रेयस अय्यरला दुखापत झाल्यामुळे कर्णधार रोहित शर्माच्या अडचणी वाढल्या आहेत.

4/7

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सिरीजपूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंनी प्रॅक्टिस सेशनमध्ये भाग घेतला होता. यावेळी श्रेयस अय्यरच्या उजव्या हाताच्या मनगटावर बॉल लागून तो जखमी झालाय.

5/7

दुखापतीनंतर तो मनगटावर बर्फ लावतानाही दिसला. काही वेळाने श्रेयस फलंदाजीला आला, मात्र एकच बॉल खेळून तो पव्हेलियनमध्ये परतला.

6/7

दरम्यान श्रेयस अय्यरची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत बीसीसीआयने माहिती दिलेली नाही. 

7/7

मात्र विराट कोहलीनंतर श्रेयस अय्यर पण टेस्ट सामन्याला मुकणार असेल हा टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जातोय.