PHOTO : 8 अफेअर्स, 3 लग्नं करुनही मिळालं नाही खरं प्रेम; पतीच्या अंत्यसंस्काराला गेली नाही 'ही' अभिनेत्री

Entertainment : 70 च्या दशकात आपल्या ग्लॅमर आणि अभिनयाने सिनेसृष्टीवर राज्य करणारी बॉलिवूडमधील ही अभिनेत्री लाखो हृदयांवर राज करायची. तिचं 8 अफेअर्स, 3 लग्नं झालं होतं, तरीदेखील ती शेवटी एकटीच होती. 

| Nov 19, 2024, 01:32 AM IST
1/11

हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांचं चित्रपटातील करिअर असो त्यांचं वैयक्तिक आयुष्यही खूप चर्चेत असतं. त्याचं वैवाहिक जीवन, प्रेम जीवन याबद्दल चाहत्यांना जाणून घेण्यात रस असतो. आज आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत 70 आणि 80 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होती. 

2/11

19 नोव्हेंबर 1951 रोजी मुंबईत जन्मलेल्या झीनत अमानची आई वर्धिनी हिंदू होती, तर वडील अमानुल्ला खान मुस्लिम होते. झीनतचे वडील हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध पटकथा लेखक होते. त्यांनी 'मुगल-ए-आझम' आणि 'पाकीजा' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट लिहिले आहेत. ते कायम अमन या नावाने पटकथा लिहित होते. म्हणून झीनतनेही तिचं आडनाव खानऐवजी 'अमन' असं लिहायची. 

3/11

अभिनेत्रीच्या लहानपणी तिच्या पालकांचा घटस्फोट झाला. पाचगणीमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर, झीनत पुढील शिक्षणासाठी लॉस एंजेलिसला गेली, परंतु तिला पदवीचे शिक्षण पूर्ण करता आले नाही. यानंतर तो भारतात परतला आणि मनोरंजनाच्या जगात प्रवेश केला.

4/11

चित्रपटांपूर्वी झीनत अमानचे मॉडेलिंगच्या जगात यशस्वी करिअर होते. फेमिना मिस इंडिया स्पर्धेत ती दुसरी उपविजेती होती , त्यानंतर तिने 1970 मध्ये मिस AISA पॅसिफिक खिताब जिंकला. ही पदवी मिळवणारी ती पहिली दक्षिण आशियाई महिला आहे.

5/11

अभिनेत्रीच्या लव्ह लाइफबद्दल बोलायचं झालं तर तिचं नाव देवानंदशी जोडलं गेलं होतं. हरे राम हरे कृष्णा चित्रपटाच्या वेळी त्यांच्यामध्ये प्रेम झाल्याची चर्चा मीडियामध्ये पसरली होती.   

6/11

मीडिया रिपोर्ट्सनुसार, झीनत आणि राज कपूर यांच्या अफेअरची बरीच चर्चा रंगली होती. त्यानंतर देवानंद आणि राज कपूर यांच्यामध्ये मदभेद झाल्याच्याही बातम्या आल्या होत्या.

7/11

अभिनेत्रीचं नाव पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानशी जोडल्या गेलं होतं. 

8/11

त्यानंतर 1978 मध्ये झीनत अमान यांनी गुपचूप संजय खानशी लग्न केलं. पण हे लग्न लपून राहिलं नाही. काही दिवसांमध्येच त्यांच्यामधील वाद समोर आले. झीनत अमाने पतीवर मारहाणीचा आरोप लावला. 

9/11

एवढंच नाही तर एकदा संजय यांनी इतकं मारलं की झीनत रुग्णालयात पोहोचल्या होत्या. तब्बल दोन वर्ष अभिनेत्रीने पतीच्या जाचाचा सामना केला. यानंतर त्यांनी हे नात्याचा अंत केला. 

10/11

अनेक वर्ष एकटं राहिल्यानंतर त्यांनी मजहर खानशी दुसरं लग्न केलं. याही लग्नाबद्दल कोणाही माहिती नव्हतं. हे लग्न काही वर्षांमध्ये संपुष्टात आलं. त्यांना एक मुलगा आहे. दरम्यान 1998 मध्ये त्यांचे पति मजहर खान यांचे देखील निधन झाले होते. झीनत या त्यांच्या पतीच्या अंत्यसंस्काराला सुद्धा गेल्या नव्हत्या. झीनत अमान यांनी सिमी ग्रेवालच्या शोमध्ये सांगितले की 'जेव्हा त्यांच्या पतीचे निधन झाले तेव्हा त्यांच्या पतीच्या कुटुंबीयांनी मजहरला तिला भेटू दिले नाही. यामुळे झीनत या अंतिम श्रद्धांजली देण्यासाठी जाऊ शकल्या नाही.

11/11

यानंतर झीनत अमानने वयाच्या 54 व्या वर्षी तिसरं लग्न करुन सर्वांना आश्चर्यचकित केलं. अभिनेत्रीने 2012 मध्ये तिच्या वयापेक्षा 21 वर्षांनी लहान असलेल्या अमन खन्नासोबत लग्नगाठ बांधली. पण या लग्नालाही यश मिळालं नाही. काही वर्षातच दोघेही वेगळे झाले. झीनत अमान आता वयाच्या 73व्या वर्षी एकटीच आयुष्य जगत आहेत.