मुकेश अंबानीच नव्हे, अनिल अंबानींचं घरही आहे तोडीस तोड; पाहून म्हणाल काय ती श्रीमंती...

Anil Ambanis luxuriou`s Mumbai home : शहरातील काही श्रीमंत व्यक्ती याच आलिशान घरांमध्ये राहतात. अंबानी कुटुंब हे त्यातलंच एक. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराचं उदाहरणच घ्या.... इथून जाताना प्रत्येक वेळी नकळत आपली नजर त्यांच्या या बहुमजली घरावर जाते. आलिशान घराच्या बाबतीत अनिल अंबानीही मागे नाहीत. 

Aug 17, 2023, 11:15 AM IST

Mumbai Housing : मुंबईत हक्काच्या घराच्या शोधात असणाऱ्या अनेकांचीच नजर शहरातील गगनचुंबी इमारतींकडे जाते आणि हा डोलारा पाहून त्यांचे डोळेही दिपतात. नजर जाईल तितक्या उंचीच्या इमारती, त्यांचे भव्य प्रवेशद्वार आणि तिथं असणाऱ्या सुविधा कुतूहल जागवणाऱ्या असतात. 

1/8

Anil Ambanis luxuriou`s Mumbai home

reliance Anil Ambanis luxurious Mumbai home worth Rs 5000 crore inside photos

Anil Ambanis luxuriou`s Mumbai home : कधी एकेकाळी जगातील 6 व्या क्रमांकाचे धनाढ्य व्यक्ती अशी ओळख असणाऱ्या अनिल अंबानी यांचं नाव त्यांच्यावर ओढावलेल्या आर्थिक संकटामुळं चर्चेत असतंच. पण, आता मात्र त्यांचं नाव त्यांच्या मुंबईतील घरामुळं प्रकाशात आलं आहे.   

2/8

17 मजली आलिशान घर

reliance Anil Ambanis luxurious Mumbai home worth Rs 5000 crore inside photos

मुंबईच्या पाली हिल भागात अनिल अंबानी यांच्या मौल्यवान संपत्तीपैकी एक असणारं त्यांचं घर आहे. बॉलिवूड अभिनेत्री- पत्नी टीना अंबानी यांच्यासह मुलं जय अनमोल अंबानी आणि जय अंशुल अंबानी यांच्यासह ते या 17 मजली आलिशान घरात राहतात. 

3/8

घराची किंमत

reliance Anil Ambanis luxurious Mumbai home worth Rs 5000 crore inside photos

रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकारांच्या मते अंबानींच्या या घराची किंमत साधारण 5000 कोटी रुपये इतकी आहे. शहरातील सर्वात महागड्या घरांमध्ये अंबानींच्या या घराची नोंद होते. 

4/8

मुंबईतील तिसऱ्या क्रमांकाचं महागडं घर

reliance Anil Ambanis luxurious Mumbai home worth Rs 5000 crore inside photos

हे मुंबईतील तिसऱ्या क्रमांकाचं महागडं घर आहे. तर, मुकेश आणि नीता अंबानी यांचं अँटिलिया 15000 कोटी रुपयांचं असून, ही किंमत अनिल अंबानी यांच्या घराहून तिपटीनं जास्त आहे. वांद्र्यातील पाली हिल परिसरात असणारं हे घर साधारण 16000 चौरस फुटांच्या भूखंडावर उभं आहे. इथं हेलिपॅडचीही सुविधा आहे. ओपन स्विमिंग पूल, जीम आणि तत्सम अनेक सोयीसुविधा इथं आहेत. 

5/8

reliance Anil Ambanis luxurious Mumbai home worth Rs 5000 crore inside photos

6/8

अनिल अंबानीयांच्या घराचं नाव

reliance Anil Ambanis luxurious Mumbai home worth Rs 5000 crore inside photos

अनिल अंबानी यांच्या कुटुंबानं या घराला Abode असं नाव दिलं आहे. 'एक असं ठिकाण जिथं तुम्ही राहता', असा या शब्दाचा अर्थ. 

7/8

पाहुण्यांसाठी खास सोय

reliance Anil Ambanis luxurious Mumbai home worth Rs 5000 crore inside photos

घरच इतकं मोठं आहे की, इथं प्रत्येक व्यक्तीला त्याची खोली. पाहुणे मंडळी आल्यास त्यांच्यासाठी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था, लाऊंज एरिया अशा गोष्टी आहेत. 

8/8

महागड्या कारचं कलेक्शन

reliance Anil Ambanis luxurious Mumbai home worth Rs 5000 crore inside photos

माध्यमांमध्ये उपलब्ध माहितीनुसार अनिल अंबानींकडे Rolls Royce, Lexus XUV, Porsche, Audi Q7 आणि मर्सिडीज अशा महागड्या कार आहेत.