लग्नाचा निर्णय घेण्याआधी जोडप्याने 'या' मुद्द्यांवर करा चर्चा, संसार होईल सुखाचा

निरोगी वैवाहिक जीवनात अनेक गोष्टींशी ताळमेळ राखणे आवश्यक आहे. प्रेम हा कोणत्याही नात्याचा भक्कम पाया असतो. पण एकमेकांना समजून घेणं, एकमेकांचा आदर करणं, एकमेकांच्या महत्त्वाकांक्षा, ध्येयं आणि गरजा जाणून घेणं, एकमेकांशी एकनिष्ठ राहणं हे वैवाहिक जीवन यशस्वी होण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं.

| Jul 18, 2023, 14:22 PM IST

Relationship Tips: निरोगी वैवाहिक जीवनात अनेक गोष्टींशी ताळमेळ राखणे आवश्यक आहे. प्रेम हा कोणत्याही नात्याचा भक्कम पाया असतो. पण एकमेकांना समजून घेणं, एकमेकांचा आदर करणं, एकमेकांच्या महत्त्वाकांक्षा, ध्येयं आणि गरजा जाणून घेणं, एकमेकांशी एकनिष्ठ राहणं हे वैवाहिक जीवन यशस्वी होण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं.

1/7

लग्नाचा निर्णय घेण्याआधी कपलने 'या' मुद्द्यांवर करा चर्चा, संसार होईल सुखाचा

2/7

प्री मॅरिटल कॉन्व्हर्सेशन

Relationship Tips pre marriage conversation important before marriage life

बहुतेक जोडप्यांना आपण एकमेकांच्या प्रेमात आहेत हीच मोठी गोष्ट वाटते. पण कोणत्याही व्यक्तीशी लग्न करण्यापूर्वी, आपण 'प्री मॅरिटल काउंसिलिंग आणि 'प्री मॅरिटल कॉन्व्हर्सेशन' महत्वाचे असते. 

3/7

संवाद महत्वाचा

Relationship Tips pre marriage conversation important before marriage life

प्रत्येक व्यक्तीची बोलण्याची स्वतःची पद्धत असते. आपल्या रोजच्या व्यस्त वेळापत्रकातही एकमेकांची प्रशंसा करणे आवश्यक आहे. तुमचा दिवस कसा गेला हे पार्टनरला सांगणे आवश्यक आहे. आपण ज्या व्यक्तीशी लग्न करू इच्छितो त्याच्याशी अशा गोष्टी शेअर करायला हव्यात.

4/7

पार्टनरशी मोकळेपणाने बोला

Relationship Tips pre marriage conversation important before marriage life

आपण आपल्या जीवनाकडे खूप सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे. तसेच आपल्याला काय चांगले वाटते आणि कशाने अस्वस्थ वाटते, याविषयी तुमच्या पार्टनरशी मोकळेपणाने बोला.त्यांना तुमचे विचार सांगा.

5/7

पैशाकडे कसे पाहतो?

Relationship Tips pre marriage conversation important before marriage life

चांगलं आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी प्रेमासोबतच पैसाही गरजेचा आहे, हे सर्वांना माहीत आहे. लग्नाआधी बोलायचे झाल्यास पैसा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आपण पैशाकडे कसे पाहतो, आपल्या खर्च करण्याच्या सवयी आणि बचत योजना काय आहेत? या सर्व गोष्टी एकमेकांना सांगायला हव्यात. आर्थिक बाबींची चर्चा दोघांच्या आयुष्यात उपयोगी पडेल आणि तुमचे भविष्य सुधारण्यास मदत होईल.

6/7

कुटुंब एकत्र येतात

Relationship Tips pre marriage conversation important before marriage life

विवाहामुळे कुटुंबेही एकत्र येतात. लग्न केवळ दोन व्यक्तींचे नसून दोन कुटुंबांचेही असते, असेही म्हटले जाते. आपल्या कुटुंबांबद्दलही आपण एकमेकांशी बोलले पाहिजे.

7/7

धर्म आणि श्रद्धा

Relationship Tips pre marriage conversation important before marriage life

अध्यात्मिक असो वा धार्मिक, तुमच्या विश्‍वासाबद्दल आणि तुम्ही अनुसरण करत असलेल्या जीवनशैलीबद्दल तुमच्या जोडीदारासमोर बोला. तुम्ही दोघेही दोन भिन्न धर्माचे असू शकता, त्यामुळे यासाठी तुमच्या जोडीदाराशी तुमच्या धार्मिक विश्वासाबद्दल मोकळेपणाने बोला. यामुळे तुम्हाला नंतर कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.