Relationship Tips: वैवाहिक आयुष्यात 'या' समस्या आहेत? आजच घ्या 'हा' निर्णय

Relationship Tips : लग्न झाल्यावर आपल्यावर अनेक नव्या जबाबदाऱ्या येतात. लग्न असो किंवा मग रिलेशनशिप यात आपल्या पार्टनवर विश्वास असणं आणि प्रेम असणं खूप महत्त्वाचं आहे. जर पती-पत्नीत या दोन्ही गोष्टी नसलीत तर त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागलो आणि ते एकमेकांसोबत रहायचं म्हणून राहतात. पण काही कारणांमुळे त्या दोघांमध्ये येणारा दुरावा इतका वाढतो की ते दोघं एकमेकांना सहन करू शकत नाही. आपल्या देशात तर लग्न केल्यानंतर सहजपणे आपण ते मोडू शकत नाही. पण कोणत्या क्षणी आपण या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला पाहिजे हे जाणून घेणार आहोत. 

| May 04, 2023, 18:23 PM IST
1/7

सतत एकमेकांच्या वाढणाऱ्या तक्रारी

RelationshipTips

तुम्ही दोघं एकमेंकांशी सतत तक्रार करत असाल आणि कधीच एकमेकांशी नीट बोलत नसाल किंवा प्रेमानं बोलत नसाल तर तुम्ही त्या नात्यातून बाहेर पडायला हवं. 

2/7

मानसिन शांती

RelationshipTips

तुमच्या वैवाहिक आयुष्यात मानसिक शांतता नसेल तर वेगळं होणं अनिवार्य आहे. कारण शारीरिकपणे आपल्या कोणती दुखापत झाली तर आपण त्यातून बाहेर पडू शकतो. थोट्या वेळानंतर ते थांबतं पण तर तुम्हाला तुमचा साथीदार सतत टोमणे मारत असेल तर त्या नात्याचा अर्थ नाही. 

3/7

एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर

RelationshipTips

बऱ्याचवेळा लग्न झाल्यानंतरही अनेक लोक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये असतात. त्याचा परिणाम हा त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर होतो. जर तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा तुमचा साथीदार तुमची साथ देत नसेल तर लवकरच ते नातं संपवा. 

4/7

हिंसाचार

RelationshipTips

कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होत असेल तरी आपल्याला त्याच्याविषयी नकारात्मक भावना निर्माण होते. जर तुमचा साथीदार शारीरिक किंवा मानसिक छळ करत असेल तर लवकरच विभक्त व्हा. 

5/7

कम्युनिकेश गॅप

RelationshipTips

तुम्ही दोघं एकमेकांशी मनमोकळेपणानं बोलत नसाल आणि तुमचा साथीदार तुम्हाला वेळ देत नसेल. याशिवाय कधीच स्वत: ची चूक आहे असं मान्य करत नसेल तर त्याचा अर्थ असा आहे की तुमच्यात कम्युनिकेश गॅप निर्माण होईल. त्यानंतर तुमच्यात दुरावा येण्यास सुरुवात होईल, त्यामुळे नेहमी मनमोकळेपणानं एकमेकांशी बोलत राह. 

6/7

एकमेकांना द्या वेळ

RelationshipTips

पती-पत्नीनं नेहमीच एकमेकांना वेळ दिला पाहिजे. फक्त कामात व्यस्त राहणं हे चुकीचं आहे. कधीही आपल्या पती-पत्नीना वेळ द्या त्यांच्यासोबत फिरायला जा किंवा काही न करता घरीच त्यांना त्यांच्या कामात मदत करा.

7/7

चुकीच्या अपेक्षा ठेवू नका

RelationshipTips

बऱ्याचवेळा लग्नाच्या आधी आपण खूप अपेक्षा ठेवतो पण तसं करू नका. जर तुम्हाला अपेक्षा असतील तर त्या तुमच्या पार्टनरकडून होऊ शकतील अशा असल्या पाहिजे. जर तुम्ही म्हणाल की त्यानं माझ्यासाठी तारे तोडून आणावे तर ते अशक्य आहे. अशा काही अपेक्षा किंवा त्यासारख्या अनेक अपेक्षा ठेवू नका. (All Photo Credit : Pexels)