हिवाळ्यात जास्त भूक लागते, मुलांना शाळेच्या डब्यात द्या 'हे' पौष्टिक पदार्थ

हिवाळ्यात अधिक भूक लागते, असा अुनभव तुम्हालाही आलाच असेल. मुलांनादेखील अशावेळी जंक फुड किंवा तेलकट पदार्थ खावेसे वाटतात. या ऋतुत वजनदेखील वाढते. अशावेळी मुलांना घरातीलच काही पदार्थ मुलांना डब्यात द्यायला हवे. 

| Nov 25, 2024, 13:52 PM IST

Healthy Tiffin Recipe: हिवाळ्यात अधिक भूक लागते, असा अुनभव तुम्हालाही आलाच असेल. मुलांनादेखील अशावेळी जंक फुड किंवा तेलकट पदार्थ खावेसे वाटतात. या ऋतुत वजनदेखील वाढते. अशावेळी मुलांना घरातीलच काही पदार्थ मुलांना डब्यात द्यायला हवे. 

1/7

हिवाळ्यात जास्त भूक लागते, मुलांना शाळेच्या डब्यात द्या 'हे' पौष्टिक पदार्थ

Healthy Tiffin Try these tasty and nutritious lunch Box food item for School children in winters

हिवाळ्यात हवेत गारवा वाढतो तसंच त्यामुळं प्रदूषणदेखील वाढते. अशावेळी मुलांना आजाराची पटकन लागण होते. त्यामुळं या मोसमात मुलांना प्रोटीनयुक्त डाएट देणे गरजेचे आहे.   

2/7

मुलांना पौष्टिक आणि हेल्दी पदार्थच डब्यात द्या. जेणेकरुन त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढेल व ते सातत्याने आजारी पडणार नाहीत. मुलं शाळेत जाताना त्यांच्या डब्यात तुम्ही हे पदार्थ देऊ शकता.

3/7

उत्तपा आणि गाजर

उत्तपा हा साधारणतः रव्यापासून बनवला जातो. यात कार्बोहायड्रेट, फायबर, प्रोटीन आणि व्हिटॅमिन्ससारखे A, B1, B2, B3, B6, B9, B12 आणि C व्यतिरिक्त मॅग्नीशियम, फॉस्फोसची मात्रा अधिक असते. यात तुम्ही गाजर, कांदा, शिमला मिरचीसारख्या भाज्यादेखील टाकू शकता. उत्तपा तूप किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये बनवू शकता. 

4/7

कॅरेट राइस आणि काकडी

कॅरट राईस बनवण्यासाठी थोडेसे तेल किंवा तूपाचा वापर करा आणि जास्तीत जास्त भाज्या टाका. यात असलेले व्हिटॅमिन सी शरीराला अँटीबॉडी बनवण्यासाठी फायदेशीर ठरतात. यामुळं रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि बदलत्या हवामानातील होणाऱ्या आजारांपासून बचाव होतो. तुम्ही यासोबत काकडीदेखील खावू शकता. ज्यात अँटीऑक्सिडेंट्स भरपूर असतात ते त्वचा निरोगी ठेवते. 

5/7

क्विनोआ, दही आणि मखाणा

क्विनोआमध्ये खूप पोषकतत्वे असतात ज्यात फायबर आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात. यामुळं वजन झपाट्याने कमी होऊ शकते. त्याचबरोबर हाडांना बळकटी येते आणि पाचनसंस्था सुधारण्यास मदत करते. तुम्ही कमी तेलात हे बनवू शकता. घरात बनवलेली दह्यात आणि मखाणेदेखील तुम्ही मुलांना देऊ शकतात. 

6/7

पनीर आणि ओव्याचे पराठे

पनीरमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फोरसची मात्रा खूप असते. जे हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर करतात. पनीरमध्ये अँटीऑक्सिडेंट गुण असतात जे रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. यात हाय कॉलिटी प्रोटीन असते जे त्वचा आणि केसांना हेल्दी ठेवण्यास मदत करते. तुम्ही कमी तेलात ओव्याचे पराठे बनवून सलाडसोबत मुलांना देऊ शकतात. 

7/7

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)