मुलीचं लग्न लावण्याआधी होणाऱ्या जावयाला विचारा हे 5 प्रश्न

Relationship Tips: आपल्या मुलीचे सासरचे कुटुंब चांगले आणि शांतीपूर्ण आयुष्य लाभावे असे प्रत्येक पालकांना वाटत असते. अशावेळी लग्नाआधी तुमच्या भावी जावयाला काही खास प्रश्न नक्कीच विचारायला हवेत. 

Pravin Dabholkar | Jan 02, 2024, 16:49 PM IST

Relationship Tips: आपल्या अंगाखांद्यावर खेळवलेली लेक दुसऱ्या घरी जाताना बापाच काळीज भरुन आलेलं असतं. वडिलांना मुलीची काळजी सतावत असते. यासाठी मुलीचे वडिल होणाऱ्या जावयाशी संवाद साधून मनातील शंका दूर करु शकतात. 

1/8

मुलीचं लग्न लावण्याआधी होणाऱ्या जावयाला विचारा हे 5 प्रश्न

Relationship Tips ask 5 questions to  Son in law before getting married

Relationship Tips: मुलीचे लग्न करणे ही बापासाठी खूप मोठी गोष्ट आहे. लग्नात होणाऱ्या खर्चासाठी नव्हे तर बाप-लेकीच्या नात्यासाठी ही महत्वाची बाब असते. मुलीच वडिलांवर जास्त प्रेम असत. त्यांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी मुलगी घेत असते. 

2/8

मनातील शंका दूर करा

Relationship Tips ask 5 questions to Son in law before getting married

आपल्या अंगाखांद्यावर खेळवलेली लेक दुसऱ्या घरी जाताना बापाच काळीज भरुन आलेलं असतं. वडिलांना मुलीची काळजी सतावत असते. यासाठी मुलीचे वडिल होणाऱ्या जावयाशी संवाद साधून मनातील शंका दूर करु शकतात. 

3/8

भावी जावयाला काय विचाराल?

Relationship Tips ask 5 questions to  Son in law before getting married

आपल्या मुलीचे सासरचे कुटुंब चांगले आणि शांतीपूर्ण आयुष्य लाभावे असे प्रत्येक पालकांना वाटत असते. अशावेळी लग्नाआधी तुमच्या भावी जावयाला काही खास प्रश्न नक्कीच विचारायला हवेत. अनेक वेळा घरातील सदस्यांना भावी जावयाला काय विचारावे हेच कळत नाही. तुम्ही तुमच्या भावी जावयाला काय विचारू शकता? याबद्दल जाणून घेऊया.

4/8

मुलीबद्दल विचारा

Relationship Tips ask 5 questions to  Son in law before getting married

तुमच्या भावी जावयाला विचारा की तो आपल्या मुलीवर प्रेम का करतो? त्याला मुलीमध्ये काय आवडलं? जर मुलाला तुमच्या मुलीचे सौंदर्य आवडत असेल तर हे नाते फार काळ टिकणार नाही. मुलीबद्दल सर्वकाही चांगले समजून घेण्याचे आवाहन तुम्ही करु शकता.

5/8

कामाबद्दल विचारा

Relationship Tips ask 5 questions to  Son in law before getting married

लग्नाआधी मुलाच्या कामाबद्दल विचारलं पाहिजे. तो काय करतो आणि कुठे काम करतो? याबद्दल तुम्हीदेखील स्वतंत्रपणे माहिती घ्या. लग्न झाले नसल्याने अजुनही वेळ गेलेली नसते. 

6/8

पगाराबद्दल विचारा

Relationship Tips ask 5 questions to  Son in law before getting married

तुम्हाला तुमच्या होणाऱ्या जावयाला पगाराबद्दल विचारावे लागेल. तो दरमहा किती पैसे कमावतो याची माहिती घ्या. त्याच्या पगाराबद्दल तुम्हाला आधीच माहिती असायला हवी. हे विचित्र वाटेल पण तुम्ही या गोष्टींबद्दल नक्कीच विचारले पाहिजे.

7/8

जबाबदारीबद्दल विचारा

Relationship Tips ask 5 questions to  Son in law before getting married

लग्नानंतर येणार्‍या जबाबदाऱ्या तुम्हाला मुलाला सांगायच्या असतात. तो या जबाबदाऱ्या पार पाडू शकेल का?, हेही सांगावे लागेल. तसेच लग्नानंतर निर्माण होणाऱ्या समस्यांबद्दलही सांगा.

8/8

वाईट सवयींबद्दल विचारा

Relationship Tips ask 5 questions to  Son in law before getting married

आपल्या जावयाने दारू अजिबात पिऊ नये, असे वाटणारे अनेक जण असतात. तर काहींना याच्याशी काही देणेघेणे नसते. अशा वेळी त्यांनी आपल्या सुनेला त्याच्या वाईट सवयींबद्दल आधीच विचारले पाहिजे. जेणेकरून तुम्हाला वाईट सवयी सोडण्याची सवय लावता येईल.