जपानच्या टोकियो विमानतळावर बर्निंग प्लेनचा थरार... विमानात 379 प्रवासी

Japan Airlines Plane on Fire at Tokyo Airport : जपानच्या टोकिया विमानतळावर आज भीषण थरार रंगला. धावपट्टीवर दोन विमानं एकमेकांना धडकली यानंतर एका विमानाला भीषण आग झाली. या विमानात 379 प्रवासी होते. 

राजीव कासले | Jan 02, 2024, 16:39 PM IST
1/7

जपानच्या टोकियो हानेडा विमानतळावर बर्निंग प्लेनचा थरार पाहिला मिळाला. दोन विमानांच्या धडकेनंतर एका विमानाला भीषण आग लागली. या विमानात 379 प्रवासी होते

2/7

जपानी न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार विमानाच्या लँडिंगनंतर ते विमान धावपट्टीवर उभ्या असलेल्या दुसऱ्या विमानाला धडकलं. त्यानंतर विमानाने पेट घेतला.

3/7

धडकेनंतर विमानातील पाच जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहती आहे. सुदैवाने विमनातील सर्व 379 प्रवासी आणि पायलटची तात्काळ सुटका करण्यात आली. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली

4/7

अपघातानंतर हानेडा विमानतळावरील सर्व विमानांची उड्डाण रद्द करण्यात आली. 

5/7

मिळालेल्या माहितीनुसार JAL 516 या विमानाला आग लागली. या विमानाने संध्याकाळी चार वाजता चिटोस विमानतळावर उड्डाण घेतलं. 17.40 मिनिटाने ते हानेडात पोहोचणार होतं. 

6/7

पण लँडिंगवेळी विमानाच्या खिडक्यांमधून आगीचे लोट येताना दिसले. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता बचावपथकाने सर्व प्रवाशांना बाहेर काढलं. पण पाच जणं बेपत्ता आहेत. 

7/7

जपानमधील ही दुसरी मोठी विमान दुर्घटना आहे. याआधी 1985 मध्ये टोकियोहून ओसाकाला जाणारं JAL जंबो जेट गुनमा परिसरात कोसळलं. या अपघातात 520 प्रवासी आणि पायलट यांचा मृत्यू झाला होता.