Realme 12 Pro Plus: काही सेकंदात लाखो फोन विकणाऱ्या कंपनीचा नवा स्मार्टफोन आलाय, कुठं मिळेल? फीचर्स आणि किंमत काय?

Realme 12 Pro Launch in India: Realme ने आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन realme 12 pro आणि Realme 12 Pro Plus लाँच केला आहे.  आज आपण   Realme 12 Pro Plus फोनचे फिचर्स , वैशिष्ट्य  आणि किंमत पाहणार आहोत. 

Jan 30, 2024, 10:50 AM IST

Realme 12 Pro मध्ये 5,000mAh बॅटरी आहे जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

1/7

Realme 12 Pro फोनला रंग हा सबमरीन ब्लू आणि नेव्हिगेटर असा असणार आहे. तुम्ही हा फोन ऑनलाईन खरेदी  फ्लिपकार्ट, Realme च्या अधिकृत वेबसाईट वर करु शकता त्याचबरोबर  रिटेल स्टोअरवरही फोन उपलब्ध असेल. 

2/7

कसा खरेदी करणार ?

हा फोन  6 फेब्रुवारी पासून ऑफलाइन पद्धतीने खरेदी करु शकता तर  प्री-ऑर्डर विंडो आज, 29 जानेवारीपासून उघडेल, त्यानंतर 30 जानेवारीला ऑनलाइन चॅनेल उघडतील.

3/7

किंमत किती?

Realme 12 Pro च्या 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 25,999 रुपये आहे आणि 8GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 26,999 रुपये इतकी आहे. 

4/7

फिचर्स काय आहेत?

Realme 12 Pro मध्ये 6.7-इंचाचा  कर्व्ड OLED FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे.  याचं रिझोल्यूशन 2412 x 1080 पिक्सेल, 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट आहे. हा फोन 10-बिट स्क्रीन 2160Hz PWM डिमिंग आणि 950 nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो.

5/7

कॅमेरा मॉड्यूल

या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Realme UI 5.0 वर काम करतो. या फोनची 8.75mm इतका रुंद आणि  190 ग्रॅम वजनाचा आहे. Realme 12 Pro मध्ये फॉक्स लेदर बॅक आणि एक मोठा कॅमेरा मॉड्यूल आहे.

6/7

कॅमेरा सेटअप

कॅमेरा सेटअपच्या बाबतीत, या स्मार्टफोनमध्ये OIS सपोर्टसह 50 मेगापिक्सेलचा Sony IMX882 कॅमेरा, 2x टेलिफोटो आणि OIS सपोर्ट 32 मेगापिक्सेल Sony IMX709 कॅमेरा  आहे. तसंच यात 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरासुद्धा  आहे. याच्या फ्रंटला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.   

7/7

इतर वैशिष्ट्य

इतर वैशिष्ट्यांमध्ये डॉल्बी ॲटमॉस सपोर्टसह ड्युअल स्पीकर्स आणि इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सरचा समावेश आहे. या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.