कॉलेजच्या काळात 5 चित्रपट नाकारले, सलमानसोबत डेब्यू करणारी 'ही' अभिनेत्री ठरली बॉलिवूडची टॉप अभिनेत्री

कॉलेजच्या काळात 5 चित्रपट नाकारणाऱ्या अभिनेत्रीने सलमान खानसोबत डेब्यू करताच बनली बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक. जाणून घ्या सविस्तर

| Sep 27, 2024, 20:33 PM IST
1/6

5 चित्रपटाची ऑफर

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन हिचे वडील प्रसिद्ध चित्रपट निर्माते होते. कॉलेजच्या काळात तिला 5 चित्रपट ऑफर करण्यात आले होते.

2/6

चित्रपट नाकारले

रिपोर्टनुसार, अभिनेत्री रवीना टंडनने या आलेल्या चित्रपटाना नकार दिला होता. सध्या अभिनेत्री तिच्या सौंदर्यामुळे देखील खूप चर्चेत आहे. 

3/6

पत्थर के फूल

कॉलेजच्या वेळी एकापाठोपाठ 5 चित्रपट नाकारल्यानंतर रवीनाला सलमान खानसोबत 'पत्थर के फूल' या चित्रपटाची ऑफर आली.   

4/6

सलमानसोबत चित्रपट

पदार्पणाच्या चित्रपटाबाबत अभिनेत्री म्हणाली की, मी सलमान खानसोबत चित्रपट करण्यास होकार दिला. दुसऱ्या दिवशी मी सलमानसोबत फोटोशूट केलं आणि तिसऱ्या दिवशी चित्रपटाला सुरुवात केली.

5/6

अंदाज अपना-अपना

सलमान खानसोबत डेब्यू केल्यानंतर रवीनाने त्याच्यासोबत 'अंदाज अपना-अपना' आणि 'कहीं प्यार ना हो जाए' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

6/6

नेहमी चर्चेत

रवीना टंडन गेल्या 33 वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत आहे. सध्या देखील अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते.