3 तासात रतन टाटांनी तिला Leadership म्हणजे काय हे समजावलं; आज 'ती' ₹62440000000 ची मालकीण

Ratan Tata Memories: रतन टाटांनी केलेल्या मदतीमुळे आणि मार्गदर्शनामुळे अनेकांचं आयुष्य बदललं. त्यामध्येच या मुलीचाही समावेश असून तुमचा विश्वास बसणार नाही पण ती आज तब्बल 6244 कोटी रुपयांचा मालकीण आहे. ही तरुणी आहे तरी कोण आणि तिला टाटांनी कशी मदत केलेली पाहूयात...

Swapnil Ghangale | Oct 24, 2024, 10:53 AM IST
1/10

ratantatanarayanamurthy

रतन टाटांनी तिच्यासाठी एकच तास काढला होता. मात्र ते तिला तब्बल 3 तास मर्गदर्शन करत होते. नेमकं कशाबद्दल रतन टाटा तिच्याशी बोलत होते आणि त्यांनी काय मदत केली जाणून घेऊयात हा रंजक किस्सा...

2/10

ratantatanarayanamurthy

3/10

ratantatanarayanamurthy

पैशांपेक्षा समाजसेवेला आणि आपण समाजाला काही देणं लागतो या भावनेतून आयुष्यभर काम केलेल्या रतन टाटा यांनी त्यांच्या आयुष्यात अनेकांच्या जीवनाला परिस स्पर्श केला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आधुनिक भारताला औद्योगिक प्रगतीची वाट दाखवणाऱ्या मोजक्या नेतृत्वांमध्ये त्यांचा समावेश होतो.   

4/10

ratantatanarayanamurthy

रतन टाटांनी केलेल्या मदतीमुळे आणि मार्गदर्शनामुळे अनेकांचं आयुष्य बदललं. त्यामध्येच इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचाही समावेश होतो. नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी सुधा मूर्ती यांचे रतन टाटांबरोबर अगदी घरोब्याचे संबंध होते. मध्यंतरी एका जाहीर कार्यक्रमात नारायण मूर्ती स्टेजवरच रतन टाटांच्या पाया पडले होते.  

5/10

ratantatanarayanamurthy

टाटांबद्दलच्या आठवणी सांगताना नारायण मूर्ती अनेकदा एक आठवण आवर्जून सांगतात ती म्हणजे एकदा रतन टाटांनी तब्बल 3 तास त्यांची कन्या अक्षता मूर्तीसाठी काढले होते. हे तीन तास रतन टाटा अक्षताबरोबर बसून तिला कॉलेज असाइनेमंट पूर्ण करण्यास मदत करत होते, असं नारायण मूर्ती सांगतात. त्यांनी 'इंडिया टुडे'ला दिलेल्या एका मुलाखतीत पुन्हा या आठवणीचा उल्लेख केला.

6/10

ratantatanarayanamurthy

1999 साली नारायण मूर्तींची कन्या अक्षता ही नेतृत्व गुणांसंदर्भातील एक अभ्यासक्रमाअंतर्गत शिकत होती. त्यावेळेस योगायोगाने तिला रतन टाटांना भेटण्याची संधी मिळाली. सुरुवातीला टाटांनी एक तासभराचा वेळ दिला होता. मात्र नंतर या दोघांमध्ये एवढी छान चर्चा रंगली की ते तीन तास अक्षताच्या अभ्यासासंदर्भात बोलत होते.

7/10

ratantatanarayanamurthy

रतन टाटांनी तीन तास अक्षताला नेतृत्वगुण म्हणजे काय असतात? त्यांची जोपासणा कशी करावी? नेतृत्वाबरोबर कोण कोणत्या जबबादाऱ्या येतात? त्या कशा पेलाव्यात यासारख्या अनेक गोष्टींबद्दल मार्गदर्शन केल्याचं नारायण मूर्तींनी सांगितलं.

8/10

ratantatanarayanamurthy

"त्यांनी तिच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. त्यांनी नेतृत्वाबद्दल, निर्णय क्षमतेसंदर्भात, समाजाप्रती असणारी सौदर्याची भावना, उच्च ध्येयवाद का आवश्यक आहे याबद्दलही तिला सांगितलं. त्यावेळेस अक्षताबरोबर असणाऱ्या माझ्या पत्नीसाठीही ते तीन तास फार मार्गदर्शक ठरले," असं नारायण मूर्ती म्हणाले. 

9/10

ratantatanarayanamurthy

या भेटीचा माझ्या फार मोठा सकारात्मक परिणाम झाला, असं नारायण मूर्तींनी सांगितलं. टाटा हे फार साधे सरळ आणि संयमी व्यक्ती होते. त्यांच्या या मार्गदर्शनाचा अक्षताबरोबरच आम्हालाही फायदा झाला, असं नारायण मूर्ती म्हणाले.

10/10

ratantatanarayanamurthy

अक्षता मूर्ती या आज ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी आहेत. त्या एक यशस्वी उद्योजिकाही आहेत. त्यांची एकूण संपत्ती 750 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 6244 कोटी रुपये इतकी आहे.