मुख्यमंत्र्यांसाठी 'हे' 2 महिने धोक्याचे! 5 जणांनी गमावली खुर्ची; पवारांनी कसंबसं राखलं पद, कारण...
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रातील यंदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल याची घोषणा न करताच निवडणूक लढवली जात आहे. मात्र महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदासंदर्भातील एक विचित्र इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. बरं ज्याबद्दल आपण बोलतोय तो विचित्र योगायोग एक दोन नाही तर तब्बल पाच मुख्यमंत्र्यांसंदर्भात घडला आहे. त्याचसंदर्भात सविस्तर जाणून घेऊयात...
1/10
2/10
राज्याला आगामी हिवाळी अधिवेशनाच्या आधिवेशनाआधी 21 वे मुख्यमंत्री मिळतील. विधानसभा निवडणुकीची लगबग 20 नोव्हेंबरपूर्वी थांबेल. 20 नोव्हेंबरला जनतेच्या मनाचा कौल मतपेटीत बंद होईल आणि 23 नोव्हेंबरला राज्याचा कारभार कोण हाकणार हे स्पष्ट होईल. सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीदरम्यान रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे.
3/10
महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो कोणीही आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण हे जाहीर केलेलं नाही. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री कोण होणार हे गूढ कायम आहे. असं असतानाच राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या इतिहासाकडे नजर टाकली तर एक फारच रंजक ट्रेण्ड दिसून येतो. सरासरीचा विचार केल्यास राज्यातील प्रत्येक पाचव्या मुख्यमंत्र्याला हिवाळी अधिवेशनानंतर आपलं पद आणि खुर्ची सोडावी लागली आहे.
4/10
आता हे काय नवीन असं तुम्हाला वाटेल, मात्र हे खरं आहे. महाराष्ट्राला पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ते विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपर्यंत एकूण 20 मुख्यमंत्री आतापर्यंत लाभले आहेत. त्यापैकी 4 मुख्यमंत्र्यांना हिवाळी अधिवेशनानंतर म्हणजेच साधारणपणे जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये पद सोडावं लागलं आहे. किंवा या दोन महिन्यामध्ये घडलेल्या घडामोडींमुळे मार्चमध्ये मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागली. हे मुख्यमंत्री नेमके कोणं आणि त्यांना पदं का सोडावी लागली. तसेच यातून शरद पवारांनी थोडक्यात आपली खुर्ची कशी शाबूत ठेवली हे पाहूयात...
5/10
वसंतराव नाईक - सर्वाधिक काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी राहिलेला नेता अशी ओळख असलेल्या वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री होते. मात्र त्यांनाही हिवाळी अधिवेशनानंतर पद सोडावं लागलं. ते तब्बल 11 वर्ष मुख्यमंत्री होते. त्यांनी 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 दरम्यान राज्याचं मुख्यमंत्रीपद भुषवलं.
6/10
बाळासाहेब भोसले - बाळासाहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना नागपूरच्या हिवाळी अधिवेशना वेळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत प्रचंड गोंधळ झाला. बाळासाहेब यांच्यावर स्वपक्षीय आमदार धावून गेले होते. काँग्रेसचेच आमदार मुख्यमंत्र्यांच्या अंगावर धावून गेल्याने मुख्यमंत्री चांगलेच खवळले होते. त्यांना बैठकीतून पळ काढावा लागलेला. हिवाळी अधिवेशनानंतर काही दिवसांनी त्याचं मुख्यमंत्रीपद गेलं. बाबासाहेब भोसले जानेवारी 1982 ते फेब्रुवारी 1983 दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले.
7/10
8/10
मनोहर जोशी- शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी ओळखले जातात. त्यांनी 1995 ते 1999 दरम्यान महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. मात्र जावयाच्या फायद्यासाठी पुण्यातील जमिनीचे आरक्षण बदलल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. पण या वादातून पद जाण्यापूर्वीच त्यांनी स्वत: आपल्या पदाचा राजीनामा दिला.
9/10
विलासराव देशमुख - दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये विलासराव देशमुख यांचा समावेश होतो. मात्र पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना त्यांना मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर एका विचित्र वादानंतर पद सोडावं लागलं होतं. अभिनेता पुत्र रितेश देशमुख आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांना घेऊन विलासराव ताज हॉटेलची ‘पाहणी’ करायला गेल्याचे फोटो समोर आले. त्यातून वाद झाला अन् हिवाळी अधिवेशनानंतर त्यांचं पद गेलं.
10/10