'रोहितचा त्यारात्री फोन आला नसता तर...', ड्रेसिंग रुममध्ये राहुल द्रविड यांचा मोठा खुलासा!

Rahul Dravid Last Dressing room Speech : भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी असलेल्या राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला आहे. अशातच अखेरच्या भाषणावेळी राहुल द्रविड यांनी रोहित शर्माच्या (Rahul Dravid on Rohit Sharma) फोन कॉलची खास आठवण काढली.  

| Jul 02, 2024, 18:26 PM IST
1/6

ड्रेसिंग रुम

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर दुसऱ्यांदा नाव कोरल्यानंतर आता हेड कोच राहुल द्रविड यांचा कार्यकाळ समाप्त झाला आहे. विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये राहुलने भावना व्यक्त केल्या.

2/6

पदावर कायम राहण्याची विनंती

कर्णधार रोहित शर्माचा मला कॉल आला होता आणि त्याला वनडेतील पराभवानंतर  हेड कोचपदावर कायम राहण्याची विनंती केली होती, असा खुलासा द्रविडने केला आहे.

3/6

रोहितचे आभार

वनडे वर्ल्ड कप फायनल झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये मला कॉल केल्याबद्दल आणि संघाशी जोडलं जाण्यास सांगितल्याबद्दल खूप खूप आभार मानतो, असं राहुल द्रविड यांनी रोहित शर्माला म्हटलं आहे.

4/6

क्षण नेहमी लक्षात राहतील

तुमच्या सर्वांसोबत काम करणं हा एक विशेषाधिकार आणि आनंद आहे. तुम्हा सर्वांना हे क्षण नेहमी लक्षात राहतील, असंही राहुल द्रविडने म्हटलं आहे.

5/6

तुमचा अभिमान वाटतो

वनडे वर्ल्ड कपनंतर तुम्ही ज्याप्रकारे परत आलात त्याचा मला खूप अभिमान आहे, एक संघ म्हणून तुम्ही उत्तम आहात, असंही राहुल द्रविड यांनी म्हटलं आहे. 

6/6

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप

दरम्यान, राहुल द्रविड यांनी ड्रेसिंग रुममध्ये विराट कोहलीच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकवून आणा, असा सल्ला राहुल यांनी टीम इंडियाला दिलाय. आणखी वाचा - '...म्हणून राहुल द्रविड यांनी पुन्हा हेड कोचसाठी अर्ज केला नाही', जय शहा यांचा मोठा खुलासा