#PriyankaNickWedding : सर चढेया रंग लाल तेरे इश्क दा....

Dec 06, 2018, 12:37 PM IST
1/6

#PriyankaNickWedding : सर चढेया रंग लाल तेरे इश्क दा....

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने अमेरिकन गायक निक जोनास याच्यासोबत लग्नगाठ बांधली. एका पुरस्कार सोहळ्याच्या आफ्टर पार्टीपासून सुरु झालेला त्यांच्या प्रेमाचा प्रवास आता सहजीवनाच्या सुखद वळणावर येऊन पोहोचला आहे. (छाया सौजन्य- सब्यसाची मुखर्जी / इन्स्टाग्राम)  

2/6

#PriyankaNickWedding : सर चढेया रंग लाल तेरे इश्क दा....

काही दिवसांपूर्वीच बी- टाऊनची ही 'देसी गर्ल' आणि तिचा परदेशी प्रियकर जोधपूर येथील उमेदभवन पॅलेसमध्ये विवाहबंधनात अडकले. (छाया सौजन्य- सब्यसाची मुखर्जी / इन्स्टाग्राम)  

3/6

#PriyankaNickWedding : सर चढेया रंग लाल तेरे इश्क दा....

ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतींमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. ज्यानंतर आता प्रियांका आणि निकचे लग्नसमारंभातील फोटो सोशल मीडियावर सर्वांचच लक्ष वेधत आहेत. (छाया सौजन्य- सब्यसाची मुखर्जी / इन्स्टाग्राम)  

4/6

#PriyankaNickWedding : सर चढेया रंग लाल तेरे इश्क दा....

सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी याने सोशल मीडियावर प्रियांकाच्या हिंदू विवाहसोहळ्यातील लूकचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती एका महाराणीसारखी दिसत आहे.  (छाया सौजन्य- सब्यसाची मुखर्जी / इन्स्टाग्राम)  

5/6

#PriyankaNickWedding : सर चढेया रंग लाल तेरे इश्क दा....

लग्नातील विधींमध्ये निक आणि प्रियांका अतिशय आनंदात दिसत असून, त्यांचे हे फोटो चाहत्यांमध्येही अनेकांच्याच पसंतीस उतरत आहेत. (छाया सौजन्य- सब्यसाची मुखर्जी / इन्स्टाग्राम)  

6/6

#PriyankaNickWedding : सर चढेया रंग लाल तेरे इश्क दा....

अतिशय सुरेख अशा या फोटोंमध्ये या नवविहाहित जोडीवरच सर्वांच्या नजरा खिळत आहेत.  (छाया सौजन्य- सब्यसाची मुखर्जी / इन्स्टाग्राम)